आपण पाहत आहोत महाराष्ट्र रिपोर्टर न्यूज़ आज च्या बातम्या...
6 डिसेंबर 1992 बाबरी विध्वंसात सामील असलेले सर्व समाज कंठकांना कठोर शिक्षा देण्यात यावी.
[रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो]भारतीय प्रजासत्ताक संविधान एकात्मता, समाजवादी,धर्मनिरपेक्ष लोकशाही स्विकृती केली असून या सर्वभौम राष्ट्रात सर्वच देशवासीयांना आपआपल्या धर्माप्रमाणे आचरण करणेचा अधिकार आहे.परंतू काही समाज कंटकांनी,समाज विघातक लोकांनी 6 डिसेंबर 1992 रोजी भारत देशाची एकतेची प्रतीक व ऐतीहासीक वारसा असलेली बाबरी मस्जीदचा विध्वंस घडून आणला व देशाच्या अस्मीतेला काळीमा फासणारे कृत्य केले आहे.आज सदर दुष्यकृत्यास 29 वर्षे होत आहेत. सदर मस्जिद ही पुरातत्त्व विभागात व वक्फ मंडळामध्ये नोंदणीकृत आहे. देशाच्या अस्मितेला काळीमा फासणारे व सदरील घटनेनंतर देशात जातीय दंगलीस कारणीभूत ठरलेल्या समाज कंटकांना कठोर शासन करण्यात यावे.बाबरी मस्जिद विध्वंस केल्यानंतर संपूर्ण देशात जातीय दंगली घडवून आणण्यात आल्या व त्यात देशातील मुस्लीम समाजातील व्यक्तीची कत्तल करुन त्यांच्या मालमत्तेची नुकसान करण्यात आली आहे.तरी जातीय दंगलीत झालेल्या पिडीत व्यक्तींना व त्यांच्या परिवारांना मालमत्तेचे नुकसान भरपाई विनाविलंब देण्यात यावे व सदर जातीय दंगलीत सामील असलेले सर्व समाज कंठकांना कठोर शिक्षा देण्यात यावी. पुढील काळात असल्या घटना होणार नाही.याबाबत दक्षता घेण्यात यावी.तरी आम्ही सदर घटनेचा जाहीर निषेध करीत आहोत.असे निवेदन मध्ये मागणी केली आहे.निवेदन वर ऍड.रफिक शेख,सय्यद मुजफ्फरअली इनामदार एम.आय.एम.प्रमुख औसा,फजले रहीम,अझहर कुरेशी,नईम शेख,फारुख काझी,हारुणखाँ पठाण,अलीम शेख,मुशिर शेख,नाजम शेख,अलीम शेख,इलायास चौधरी,जब्बार पटेल,पाशा शेख,बागवान सलीम,कोडाजी शेख,महेबूब शेख मौला शेख,आसीफ शेख इत्यादिंच्या स्वाक्षरी आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.