औरंगाबादने आपल्या देशाला काय दिले ? असा प्रश्न जर कोणी मला विचारला तर मी उलट प्रश्न विचारेन कि काय नाही दिले ?
थोर स्वातंत्र्यसेनानी ,विचारवंत ,साहित्यिक ,शिक्षणमहर्षी ,क्रीडापटू पासून ते वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्वांनी आपले योगदान दिले आहे .
वैद्यकीय म्हटले कि आयुर्वेद, होमिओपॅथी आणि ऍलोपॅथी आलेच .परंतु किती जणांनी युनानी औषधांबद्दल ऐकले आहे ? ( खास करून तरुण मंडळी )
१०० वर्षा पूर्वी ,त्यावेळच्या दक्खन ( निझाम राज्य ) मध्ये औरंगाबादच्या एका हुशार आणि कर्तबगार व्यक्तीने युनानी वैद्यकीय क्षेत्रात क्रांती घडवूंन आणली .ते होते जनाब मोहम्मद हकीम मोइझुद्दीन फारुकी .जन्म जरी गुलबर्ग्याचा तरी पूर्ण कुटुंब औरंगाबादचे .
हर मरझ कि दवा---------------------- जिंदा तीलीस्मात
छोट्या शिशीतील गडद तपकिरी रंगाचे जादुई औषधाचा जनक म्हणजे जनाब फारुकी साहेब.
आमच्या लहानपणी किरकोळ आजारासाठी ( सर्दी, खोकला, अंगदुखी, खरचटणे ) रामबाण उपाय म्हणजे "आजीचा बटवा " . कुठल्याही डॉक्टर कडे जाण्या आधी हमखास हा उपाय लागू पडत असे . ह्या जादुई बटव्यामध्ये घरगुती औषधांचा खजिना असे .(तुळस, गुगळेंसत्व ,विलायचीय, लवंग , अमृतांजन आणि जिंदा तीलीस्मात )
इतिहासात युनानी म्हणजे वनौषधी शास्त्राचा उगम ग्रीक देशात आढळतो . पर्शिअन आणि अरेबिक वैद्यांनी हे शास्त्र आत्मसात करून ह्याला "युनानी टीब" असे नाव दिले म्हणजे "ग्रीक चे औषध " .
१८८० साली , फारुकी साहेबानी हैदराबाद ला एक छोटसे क्लिनिक सुरु केले जिथे किरकोळ आजारावर वनऔषधांचा अर्क वापरून रोग्यांना बरे करायला सुरुवात केली .हा हा म्हणता रोग्यांची रीघ लागली . फारुकी साहेबांच्या औषधाने जणू काही जादूची कांडीच फिरवली .हि वार्ता निझाम राजाच्या कानी आली , त्यांनी सन्मानपूर्वक फारुकी साहेबाना ह्या संजीवनी बुटी चे मोठया प्रमाणावर उत्पादन करण्यास परवानगी दिली.
दस्तुरखुद्द निझाम सरकारने आपल्या राज टोपी ( दस्तर ) चे चिन्ह ट्रेडमार्क म्हणून वापरण्यास परवानगी दिली .आणि १९२० साली हैदराबाद मध्ये "जिंदा तीलीस्मात" कारखान्याचा शुभारंभ झाला .
."जिंदा तीलीस्मात" चा अर्थ "जगण्याची जादू "
त्या काळात जाहिरातीचे एवढे प्रस्थ नव्हते . फिल्मी चेहरे किंवा स्त्रिया मॉडेल म्हणून वापरणे फारुकी साहेबाना पसंद नव्हते .तुम्ही जर बाटलीच्या ऑरेंज रंगाच्या पॅक वर बघितले तर एक हातात धनुष्य बाण घेतलेला आफ्रिकन योद्धा तुम्हाला दिसून येईल. निझाम चे त्या काळी अंगरक्षक होते इथिओपिया (आफ्रिका ) देशातील उंचेपुरे धिप्पाड " सिद्धी " योद्धे .
हे सुरक्षा रक्षक म्हणजे विश्वास, संरक्षण आणि उत्तम आरोग्याचे प्रतीक आणि म्हणूनच "जिंदा तीलीस्मात" सुद्धा एक प्रकारचा विश्वास आणि संरक्षण देणारे आणि उत्तम आरोग्य सांभाळणारे .
आजही हा कारखाना दिमाखात उभा आहे आणि सर्व प्रकारच्या औषधी निर्माण करणाऱ्या बाजारात आणि त्यातील स्पर्धाना यशस्वीपणे तोंड देत लोकांच्या विश्वासाला पात्र ठरत आहे. एक किंमत फक्त वाढली आहे बाकी आतील सामुग्री तीच आहे
फारुकी दंतमंजन पण ह्याच कंपनी चे बरं का
आमच्या घरी "आजीचा बटवा " हे जवळपास नामशेष झाल्यात जमा होते पण आता कोविड मूळे परत त्याचे महत्व कळून चुकले .
काय मग ठेवता ना असा जादुई बटवा ?
note: या सोबत फोटो जोडले आहेत ज्यात निझाम सरकारची राजटोपी( दस्तर) आणि आफ्रिकन योद्धा " सिद्धी " जरूर बघा .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.