आंबेडकरी चळवळ यशस्वी करणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय असेल - प्रा.डॉ.संजय शिंदे यांचे प्रतिपादन

 

आंबेडकरी चळवळ यशस्वी करणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय असेल 
- प्रा.डॉ.संजय शिंदे यांचे प्रतिपादनआंबेडकरी चळवळ यशस्वी करणे हेच माझ्या जीवनाचे ध्येय असेल 
- प्रा.डॉ.संजय शिंदे यांचे प्रतिपादन






लातूर ः भारतात विषमताधिष्ठीत विचाराच्या धोकेबाज लोकांनी राज्यसत्तेवर कब्जा मिळविला असून समताधिष्ठित आंबेडकरी विचाराची चळवळ धोक्यात आली आहे. हे भारतावर आलेले फार मोठे संकट आहे. हे अरिष्ठ थोपविण्यासाठी फुले, शाहु, आंबेडकर, अण्णाभाऊ या महापुरूषांच्या विचारांची चळवळ अधिक गतीमान करून ती यशस्वी करणे हेच माझ्या जीवनाचे अंतीम ध्येय असेल असे प्रेरणादायी प्रतिपादन फकिरा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.संजय शिंदे यांनी केले आहे.
प्रा.संजय शिंदे यांची महाराष्ट्र शासनाच्या अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल फकिरा ब्रिगेड लातूर शाखेच्यावतीने सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी ‘लसाकम’ चे संस्थापक नरसिंग घोडके होते तर जि.प.चे सदस्य संजय दोरवे, बालाजी कांबळे, नारायण कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा.संजय शिंदे सत्काराला उत्तर देतांना पुढे म्हणाले की, मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या जाळ्यात अडकणारा कार्यकर्ता नसुन फुले-शाहु-आंबेडकरी विचाराचा अनुयायी आहे. केवळ आपली लेखणी आणि वाणी यामुळे महाराष्ट्र शासनाने अण्णाभाऊ साठे चरित्र व प्रकाशने समितीच्या सचिवपदी आपली निवड केली आहे. सर्वांचे सहकार्य मिळवून या पदाला न्याय देईन असा मला आत्मविश्‍वास आहे हे सांगण्यासाठी प्रा.शिंदे विसरले नाहीत.
यावेळी बोलतांना संजय दोरवे, बालाजी कांबळे आणि नारायण कांबळे यांनी आपल्या विद्यार्थी जीवनात ‘लसाकम’ या परिवर्तनवादी संघटनेच्या संस्कारातून आम्ही व संजय शिंदे यांची जडण-घडण झाली आहे. त्यामुळे परिवर्तनाच्या चळवळीच्या यशस्वीतेसाठी आम्ही सांघिक प्रयत्न करू असे म्हटले. तर अध्यक्षीय भाषण करतांना नरसिंग घोडके यांनी समर्पित आणि त्यागी कार्यकर्त्यांच्या योगदानावरच चळवळीची यशस्वीता अवलंबुन असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन फकिरा ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र लोदगेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन संतोष पटनुरे यांनी केले. यावेळी संजय विरूळे, नंदु राऊत, अविनाश साठे, पांडूरंग मस्के, बाळासाहेब वाघमारे, सुदर्शन शिंदे, श्रीरंग सरवदे, हिरालाल कांबळे, मुकेश लोंढे, दिपक कांबळे, दत्ता साठे आदि उपस्थित होते. 


आपला
प्रा.राजेंद्र लोदगेकर
मो.7972681519

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या