कराटे स्पर्धेमध्ये योगिता सावंत सुवर्णपदकाची मानकरी
औसा-येथील कुमारी योगिता नेताजी सावंत या विद्यार्थिनीने आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सुवर्णपदक व एक सिल्वर मेडल तर तिचा भाऊ अनुराग नेताजी सावंत यांनी ब्राँझ पदक मिळवून आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये उज्वल यश संपादन केले आहे.
लातूर येथील सुशिलादेवी विद्यालय येथे आज अमीर शेख यांनी दिनांक 26 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सावंत योगिता आणि सावंत अनुराग या बहिण भावांनी उज्वल यश संपादन केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक म्हणून अजित ढोले यांनी मार्गदर्शन केले होते.सावंत बंधू-भगिनीच्या कराटे स्पर्धेतील उज्वल यशाबद्दल औसा तालुक्यात सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.