थकित मालमत्ता करापोटी तीन दुकाने सील
मनपाची धडक कारवाई
लातूर/प्रतिनिधी: अनेक दिवसांपासून थकलेला मालमत्ता कर न भरल्यामुळे मनपाने औसा रोडवरील तीन दुकानांना शुक्रवारी (दि.७ जानेवारी) सील ठोकले.
औसा रस्त्यावर श्रीमती गीतांजली भास्कर मोरे यांच्याकडे मालमत्ता कराची ७ लाख १२ हजार ४७२ रुपये थकबाकी होती.यासंदर्भात संबंधितांना नोटिसा देऊनही थकबाकी भरणा केला जात नसल्याने मनपा आयुक्तांनी संबंधित मालमत्ता सील करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार श्रीमती मोरे यांच्या मालमत्तेतील तीन दुकानांना सील ठोकण्यात आले.
नोडल ऑफिसर समद शेख,बी झोन पथक प्रमुख नंदकिशोर तापडे यांच्या सुचनेवरून क्षेत्रीय अधिकारी किशोर पवार,सहाय्यक कर निरीक्षक प्रकाश खेकडे, वसुली लिपीक सुनिल शिंदे,विक्की खंदारे,सिद्धाजी मोरे,संतोष पिसके,निसार शेख व परमेश्वर झेंडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.