"रामनाथ विद्यालयात कोविड लसीकरनास प्रारंभ"
रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आलमला तालुका औसा येथे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना कोवीड लसीकरण देण्यास दिनांक 6 / 1/2022 रोजी प्रारंभ करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच श्री कैलास निलंगेकर उपस्थित होते उद्घाटक म्हणून भादा आरोग्य विभागाचे अधिकारी श्री रेड्डी जी .के. उपस्थित होते याप्रसंगी दोन्ही मान्यवरांचा रामनाथ शिक्षण संस्थेच्या वतीने शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी दोन्ही मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना करुना कालावधी मध्ये घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले व लसीकरणाचे महत्त्व मुलांना सांगितले या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापिका सौ पाटील अनिता , डॉक्टर एस एस पाटील, आरोग्य सेविका शिंदे पी एस, औसा शिक्षण विभाग च्या दिवे मॅडम उपस्थित होते लसीकरण यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या पोद्दार मनोरमा, लांडगे दैवशाला ,पांचाळ राधा लांडगे या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले विद्यालयातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना मोफत लसीकरण करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पी .सी .पाटील सर यांनी केले तर आभार प्रदर्शन भास्कर सूर्यवंशी यांनी केले कार्यक्रमास विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.