दर्पण दिनानिमित्त एम आई एम प्रमुख औसा तर्फे पत्रकारांचा सन्मान
दर्पण दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान
औसा मुख्तार मणियार
औसा- दर्पण दिनानिमित्त आज दिनांक 6 जानेवारी 2022 गुरुवार रोजी शासकीय विश्रामगृह औसा येथे एम आय एम पक्षाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.त्याअनुषंगाने एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा तालुक्यातील पत्रकारांना आमंत्रित केले होते.या कार्यक्रमाची सुरूवात जेष्ठ पत्रकार रमेश दुरुगकर यांना पहिला सन्मान एक डायरी एक पेन देऊन सर्व पत्रकारांना सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांच्या हस्ते एक डायरी एक पेन देऊन सन्मानित केले. यावेळी आपण आपल्या माध्यमातून माझ्यासारख्या एक लहान सामाजिक कार्यकर्त्याला या पत्रकार संघातर्फे या आपल्या प्रसिद्धी माध्यमांतून मला प्रसिद्धी देऊन आपण खुप माझ्यावर उपकार केलेले आहेत.मीआपले उपकार विसरु शकत नाही, किंवा माझा पक्ष सुध्दा विसरु शकणार नाही आणि हे माझ्या एका परिवारामध्ये आहात आपण सगळ्यांनी मला परिवार समजून माझ्यावर प्रेम केलेले आहे.या निमित्ताने मी आपलं एक छोटासा कार्यक्रम घेऊन माझ्या वतीने छोटासा सन्मान केला आहे.याच्या पाठीमागे उद्देश काही नाही फक्त एक मित्र आणि एक बांधिलकी एक मेकावर प्रेम राहावे असे यावेळी सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी सांगितले.यावेळी या दर्पण दिनानिमित्त कार्यक्रमात पत्रकार संजय सगरे, काशीनाथ सगरे, मं.मुस्लीम कबीर, जयपाल ठाकूर,मजहर पटेल,आसेफ पटेल, विनायक मोरे,एस ए काझी,मुख्तार मणियार,आदि पत्रकारांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.