*
*दिनांक: 12/01/2022*
*मा.जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश डावलून covid-19 विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी लातूर पोलिसाकडून 52 व्यक्तीविरोधात 23 गुन्हे दाखल.*
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, covid-19 रुग्णांची संख्या दररोज वाढत असून गर्दी टाळणे हाच कोरोना संसर्ग रोखण्यावर वरील प्रभावी उपाय असल्यामुळे याबाबत प्रशासनाने नियम व मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
त्यानुसार मास्क अनिवार्य करण्यात आले असून मॉल-हॉटेल व अन्य सार्वजनिक ठिकाणी दोन डोस घेतलेल्याना, सोशल डिस्टंसिंग चे पालन करून, गर्दी न होऊ देता मास्कचा वापर करून व्यवसाय व दैनंदिन कामकाज करण्याची परवानगी आहे. परंतु शहरातील काही हॉटेल्स, कोचिंग क्लासेस, पान-टपरी, ऑटोमोबाईल्स, कॉफी शॉप चालक व इतर आस्थापना चालक कडून नियमांचे पालन होत नसून सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे.
त्यावरून पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांचे आदेशान्वये लातूर पोलिसाकडून प्रशासनाने घालून दिलेल्या covid-19 नियमांचे उल्लंघन करणारे, विना मास्क फिरणारे व्यक्ती, गर्दी करुन जमाव जमून व्यवसाय करणारे दुकानदार, सोशल डिस्टंसिंग चे पालन न करता लोकांची जीवितास व व्यक्तिगत सुरक्षिततेस बाधक कृती करणारे 52 व्यक्ती विरोधात विरोधात *कलम 188, 269, 270 भादवि, कलम 51(ब),राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, कलम 11 , महाराष्ट्र covid-19 उपाययोजना अधिनियम 2020, कलम 2 ,3 , 4 साथीचे रोग अधिनियम तसेच कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा* व इतर कायद्यान्वये एकूण 23 गुन्हे दाखल करण्यात आले असून ते पुढील प्रमाणे.
1) पोलीस ठाणे शिवाजीनगर गुन्हा रजिस्टर क्रमांक 35/2022
2)पोलीस ठाणे शिवाजीनगर गुन्हा रजिस्टर क्रमांक 36/2022
3)पोलीस ठाणे शिवाजीनगर गुन्हा रजिस्टर क्रमांक 37/2022
4)पोलीस ठाणे शिवाजीनगर गुन्हा रजिस्टर क्रमांक 38/2022
5)पोलीस ठाणे शिवाजीनगर गुन्हा रजिस्टर क्रमांक 39/2022
6) पोलीस ठाणे शिवाजीनगर गुन्हा रजिस्टर क्रमांक 40/2022
7) पोलीस ठाणे शिवाजीनगर गुन्हा रजिस्टर क्रमांक 41/2022
8) पोलीस ठाणे गांधी चौक गुन्हा रजिस्टर क्रमांक 26/2022
9) पोलीस ठाणे मुरुड गुन्हा रजिस्टर क्रमांक 11/2022
10) पोलीस ठाणे एमआयडीसी गुन्हा रजिस्टर क्रमांक 15/2022
11) पोलीस ठाणे गातेगाव गुन्हा रजिस्टर क्रमांक 03/2022
12) पोलीस ठाणे औसा गुन्हा रजिस्टर क्रमांक 14/2022
13) पोलीस ठाणे औसा गुन्हा रजिस्टर क्रमांक 15/2022
14) पोलीस ठाणे भादा गुन्हा रजिस्टर क्रमांक 06/2022
15) पोलीस ठाणे किल्लारी गुन्हा रजिस्टर क्रमांक 06 /2022
17) पोलीस ठाणे निलंगा गुन्हा रजिस्टर क्रमांक 14/ 2022
18) पोलीस ठाणे कासार शिरशी गुन्हा रजिस्टर क्रमांक 06/2022
19) पोलिस ठाणे देवणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 05/2022
20) पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण गुन्हा रजिस्टर क्रमांक 18/2022
21) पोलीस ठाणे किनगाव गुन्हा रजिस्टर क्रमांक 05/2022
22) पोलीस ठाणे रेनापुर गुन्हा रजिस्टर क्रमांक 11/2022
23) पोलीस ठाणे रेनापुर गुन्हा रजिस्टर क्रमांक 12/2022
याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे .
लातूर पोलिसाकडून आवाहन करण्यात येते की ,शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत भर पडत चालली आहे.त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी मास्कचा वापर करणे, विनाकारण भटकंती टाळणे, सोशल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझरचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे.स्वयस्फूर्तीने नियमांचे पालन केल्यास covid-19 च्या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यास मदत होणार आहे.
नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून कुटुंबीयांची काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाच्या कोरोना नियमावलीनुसार नागरिकांनी वर्तन करावे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.