प्रा.शा.बुधोडा येथे जिजाऊ जयंती व युवादिन साजरा

 *प्रा.शा.बुधोडा येथे जिजाऊ जयंती व युवादिन साजरा*






         आज दि.१२ जानेवारी २०२१ रोजी जि.प.प्रा.शा.बुधोडा येथे राजमाता जिजाऊ यांची जयंती आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती "युवा दिन"  म्हणून कोविड:१९ चे नियम पाळून साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली.

         श्रीमती पवार सुरेखा आणि श्रीमती स्वामी जयश्री मॅम यांच्या हस्ते जिने स्वराज्याचा विधाता घडविला त्या राजमाता जिजाऊ आणि युवकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून आणि श्रीफळ फोडून पूजन करण्यात आले.

           याचवेळी *जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा* या अभियानाचीही यशस्वी सांगता करण्यात आली.

       या छोट्याशा कार्यक्रमाची सारी रुपरेषा शाळेचे मुख्याध्यापक श्री घंटे युवराज सरांनी पार पाडली.तर आभार श्रीमती भारत कांबळे मॅम यांनी मानून कार्यक्रमाची सुंदर सांगता केली.यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक/शिक्षिकांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या