विकेल ते पिकेल' योजना सुरू

 'विकेल ते पिकेल' योजना सुरू




औसा- तालुका कृषी अधिकारी ,औसा महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या "आत्मा" या योजनेअंतर्गत" संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानां" अतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला मोक्याच्या ठिकाणी विकता यावा व अधिक फायदा व्हावा या शुद्ध हेतूने शासनाच्या "विकेल ते पिकेल 'या योजनेअंतर्गत तालुक्यातील भाजीपाला फळ पीक शेतकऱ्यांनी शासनाकडून भाजीपाला विक्री कीट देण्यात येणार असून या संदर्भात तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील बी टी एम विनायक गायकवाड मो. नं ८४५९६२७९०० यांच्याकडे दिनांक 20 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज करावेत व यानंतर आलेल्या अर्जाचा विचार होणार नाही असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय कुमार ढाकणे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या