औशात नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे हजारो लिटर पाणी वाया

 औशात नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे हजारो लिटर पाणी वाया 




औसा प्रतिनिधी औसा नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे शहरातील लातूर वेस हनुमान मंदिरापासून खादीभंडार भादा  रोड वरून एखादे कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी साचले असून वाहनधारकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे पाणीपुरवठ्याच्या वाल मधून हजारो लिटर पाणी वाया जात असून रस्त्यावर पाणी व शिक्षक चिखल साचला आहे तसेच या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. जानेवारी महिन्याचा पंधरवडा उलटला तरी या रस्त्यावरून पावसाळ्यात प्रमाणे पाणी वाहत असल्याने परिसरातील नागरिक व वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या बाबीची गंभीर दखल घेऊन मुख्याधिकारी वसुधा फड यांनी पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना देऊन रस्त्यावरून वाया जाणारे पाणी बंद करावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या