बहारो फुल खिले पण इथ कोणी फुले येऊच देत नाही झाडांना फुलांचा भर येत आहे आणि हे फुलांची छाटणी करत आहेत डोकं फोडून फोडून आम्ही परेशान झालोय

 


बहारो फुल खिले 
पण इथ कोणी फुले येऊच देत नाही 
झाडांना फुलांचा भर येत आहे आणि हे फुलांची छाटणी करत आहेत 
डोकं फोडून फोडून आम्ही परेशान झालोय 
पण लातूर मनपा लाश मनपा....
उद्यान विभागच अस्तित्वात नाही तर त्यांना तरी काय माहिती
फूल झाडांच्या छाटण्या कधी कराव्या.
पिवळ्या फुलांच्या टिकोमा याची छाटणी अंदाजे ऑगस्ट च्या  शेवटच्या आठवड्यात करायला हवी, जेणेकरून सप्टेंबर मध्ये याला नवीन पालवी येते , नवीन फांद्या फुटतात आणि थोडीशी उन्हाची चाहूल लागली म्हणजे सप्टेंबर चा शेवटचा आठवडा किंवा ऑक्टोबर मध्ये या झाडांना पिवळी गडद पिवळ्या रंगाची फुले लागतात.
याला आलेल्या फुलांचा बहr म्हणजे मधमाशांसाठी आणि छोट्या कीटकांसाठी ही पर्वणीच असते.
 या फुलांमध्ये असंख्य अशी किटके मधमाश्या मुंगे मुंगळ्या यांचे जीवन चक्र फुलपाखरू यांचे जीवन चक्र सुरू असतं. पण लातूर महानगरपालिकेमध्ये उद्यान विभागांमध्ये आवश्यक असे तज्ञ बागकाम करणारे व्यक्तीच नसल्यामुळे लातूर मध्ये सगळीकडे अशी दुरावस्था दिसून येत आहे.
अवेळी झाड कट करण, आलेल्या फुलांचा बहर कट करणे, त्यांची कटिंग करणे अशा वेदनादायी गोष्टी सातत्याने केल्या जातात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या