लातूर, दि. 09 (जिमाका) : लातूर जिल्ह्यातील ज्या नागरिकांनी अद्याप मतदार यादीमध्ये् आपले नाव नोंदविलेले नाही, अशा नागरिकांनी आपल्या जवळच्या तहसील कार्यालय येथे शुक्रवार, दि.२० ऑक्टोबर, २०२३ रोजी आयोजित केलेल्या विशेष मतदार नोंदणी कॅम्प मध्ये जाऊन आपली मतदार नोंदणी करावी. या मतदार नोंदणी उपक्रमांनी जास्तीत जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून ‘One Mission 100% Voter Registration’ हा उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले आहे.
दि.२० ऑक्टोबर, २०२३ रोजी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये ‘One Mission 100% Voter Registration’ या उपक्रमाची घोषणा केली आहे.
निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी, २०२४ या दिनांकावर आधारित मतदार याद्यांचे संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीत १८ ते १९ वयोगटातील व्यक्तींची नोंदणी करणे, महिला मतदार यांची नोंदणी करणे, तृतीयपंथी मतदरांची नोंदणी करणे तसेच दिव्यांग व्यक्तींची मतदार यादीत नोंदणी करणे / फ्लॅगिंग (Flagging) याचा अंतर्भाव या उपक्रमात असणार आहे.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.