नवप्रविष्टि, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साह संपन्न

 नवप्रविष्टि, गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साह संपन्न

.......................................




औसा (प्रतिनिधी )

      हिंदुस्तानी एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित अजीम कनिष्ठ महाविद्यालय औसा येथे दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी इयत्ता अकरावी वर्गात नवप्रवेशित  व गुणवंत विद्यार्थी-शेख सुलेमान अफसर साहेब ,माजी विद्यार्थिनी शेख कुलसुम निजामुद्दीन , शेख नाज अफसर साहेब (पदवी परीक्षेत सुवर्णपदक विजेते )तसेच जिल्हास्तरावर खेळात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

     विद्यार्थी प्रिय स्व. एन. बी. शेख साहेबांच्या प्रेरणेतून औसा तालुक्यात नावारूपास आलेले शिक्षणाचे माहेरघर म्हणजे अजीम कनिष्ठ महाविद्यालय होय. दरवर्षी कला, वाणिज्य, विज्ञान व उर्दू माध्यम शाखेत मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेश घेतात. येथे  विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देऊन सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिले जाते.

     या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ. मासूमदार इ.यू., प्रमुख पाहुणे साहित्यिक दि .ना.फड तसेच प्रा. शेख फिरोज फारूख (सोमेश्वर विद्यालय, घाटनांदुर) हे लाभले. संस्थेचे सचिव डॉ. अफसर शेख साहेब (माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष औसा), प्राचार्य शेख निजाम सर, प्रा. कुलकर्णी एस.बी. पर्यवेक्षक प्रा. शेख दानिश सर यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रा. बिरादार एस. एस., प्रा. लावण एस.आर.,प्रा. धोंडदेव आर .सी., प्रा. शेख एम.ए. व सर्व शिक्षक बंधू- भगिनी उपस्थित होते. दि .ना .फड साहेबांनी विद्यार्थातील नैसर्गिक गुणांचा विकास म्हणजेच शिक्षण असे विचार मांडले तर प्राचार्य, निजाम सरांनी स्पर्धेच्या युगात आपल्याला सिद्ध करण्यासाठी  आपल्यात कौशल्य विकासाबरोबरच मूल्य देखील महत्त्वाचे आहेत असे म्हटले. अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोळ साक्षी या विद्यार्थिनीने तर आभार बनसोडे गायत्री यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या