बोरफळ रस्तावरील गटार दोन्ही बाजुने भरली असल्याने घाण पाणी रस्त्यावर साचत आहे ते साफ करा
औसा (प्रतिनिधी )एम. आय. एम. च्या वतीने निवेदन करण्यात येते की, औसा बोरफळ रस्ता हा पुढील भागात असलेल्या शेतकऱ्यांना शेतीला जाणारा एकमेव रस्ता आहे व याच रस्त्यावर पुढे दोन ते तीन स्मशान भूमी असून या रस्त्यावर दोन्ही बाजुने मोठी गटार असून मागदारीमार्फत पाणी मोट्या ओढ्याला पाणी वाहुन जाते. सदरील नाली तुडूंब भरलेली असल्यामुळे त्यामध्ये पाणी साचुन पुढे रस्त्यावर पाणी साचत आहे. ही गटार मागील एक वर्षापुर्वी काढलेली आहे. नळाचे पाणी आल्यानंतर त्याला ओढ्याचे स्वरुप येत आहे. तशेच त्या रस्त्यावरील स्ट्रीट लाईटही बंद आहेत.
तरी सदरील नाली लवकरात लवकर काढून नाली मोकळी करुन घ्यावी. व स्ट्रिट लाईट बसवून घ्यावे. जेणे करून नागरीकांना त्या रस्त्यावरुन पुढे जाणे येणे रात्री अपरात्री कठीण होणार नाही.अशी मागणी सय्यद मुजफ्फरअली इनामदार,एम.आय.एम. प्रमुख, औसा.यांनी मुख्याधिकारी नगर परिषद औसा कडे केली आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.