पॅन-आधार लिंक करण्यासाठी केवळ 8 दिवस शिल्लक.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स (CBDT)-पॅन-आधार लिंकिंगची डेडलाइन वाढवून आता 30 जूनपर्यंत मुदत देऊ केली आहे.
✅ *इन्कम टॅक्स रिटर्न* दाखल करण्यासाठीसुद्धा आधार-पॅन लिंकिंग बंधनकारक आहे. काही दिवसांपूर्वी आयकर विभागाकडून इशारा देण्यात आला होता की, पॅन-आधार लिंक न केल्यास *पॅनकार्ड रद्* करण्यात येईल.
✅ मात्र डेडलाइन आधी तुम्ही हे दोन दस्तावेज लिंक केले नाही तर तुम्हाला *दंड* देखील बसू शकतो. आयकर कायदा 272B अंतर्गत तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड देखील बसू शकतो. आयकर कायद्या अंतर्गत काही गैरसोयींना तुम्हाला सामोरे जावे लागू शकते. उदाहरणार्थ तुम्हाला 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम बँक खात्यातून काढायची आहे किंवा भरायची आहे, तर त्याकरता पॅन कार्ड आवश्यक आहे. आधारशी लिंक न केल्यामुळे तुमचे पॅन निष्क्रिय राहील. परिणामी हा व्यवहार तुम्हाला पूर्ण करता येणार नाही.
आधार-पॅन लिंकिंग कसं कराल?
▪️आधार पॅन लिंकिंगसाठी incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर जा.
▪️तिथं तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर CLICK HERE या पर्यायावर क्लिक करून माहिती द्या.
▪️तुम्हाला आधार-पॅन लिंक आहे किंवा नाही याची माहिती मिळेल. लिंकिंग झालं नसेल तर तुमचा पॅन नंबर, आधार नंबर, नाव आणि कॅप्चा दिल्यानंतर 'लिंक आधार' पर्यायावर क्लिक करा.तुमचे आधार पॅन कार्ड लिंकिंग होऊन जाईल.
▪️'View Link Aadhaar Status' वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक झालं आहे की नाही ते समजेल
▪️याची माहिती तुम्हाला 567678 किंवा 56161 यावर एसएमएस पाठवूनही मिळवता येते.
▪️UIDPAN<space><आधार क्रमांक><space><पॅन क्रमांक> हा मेसेज वर दिलेल्या क्रमांकावर पाठवाला लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार पॅन लिंक झाले की नाही हे समजेल.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.