लातूर 91 स्वाबपैकी 71 निगेटिव्ह, 10 पॉझिटिव्ह तर 10 अनिर्णित






*लातूर 91 स्वाबपैकी 71 निगेटिव्ह, 10 पॉझिटिव्ह तर 10 अनिर्णित*

*आज उदगीर येथील 4 व लातूर येथील 3 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून सुट्टी*

*जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 75, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 158 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 13*

लातूर, दि.23(जिमाका):- आज दिनांक 23 जून 2020 रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत जिल्ह्यातून 91 व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते. त्यापैकी 91 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह, 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर 10 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आलेले आहेत.
          विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेतील 23 व्यक्तींचे स्वाब  तापसणीसाठी आले होते त्यापैकी 20 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा  अहवाल पॉझिटिव्ह( पूर्वीचाच रुग्ण) आला असून  02 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती या संस्थेच्या रुग्णालयात दाखल होती 14 दिवसानंतर पुनर्तपासणी केली असता त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . *(आज या संस्थेतील नवीन एकाही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही)*
       महानगरपालिकेकडून 18 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 14 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 04 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. *पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या 2 व्यक्ती भोई गल्ली व 2 व्यक्ती दयाराम रोड कुरेशी गल्ली लातूर येथील आहेत. 1 पॉझिटीव्ह व्यक्ती पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव, 1 पॉझिटिव्ह व्यक्ती नागोरे मंगल कार्यालय उदगीर, 1 पॉझिटिव्ह व्यक्ती अंधोरा तालुका औसा, 1 पॉझिटिव व्यक्ती माळकोंडजी तालुका औसा तर 2 पॉझिटिव व्यक्ती कालन गल्ली औसा* असे एकूण आज जिल्ह्यात 10 व्यक्तींचे आवहल पॉझिटिव आलेले आहेत, अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे.

 *आज रुग्णालयातून 7 रुग्णांना सुट्टी*
      आज उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून विकास नगर येथील चार रुग्णांना प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर लातूर येथील 1000 मुला मुलींचे वस्तीगृह येथील कोविड केअर सेंटर मधून चौधरी नगर 2 व बाभळगाव येथील 1 असे एकूण तीन रुग्णांना सुट्टी देण्यात आली. याप्रमाणे लातूर जिल्ह्यातून आज 7 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने  रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 75, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 158 मृत्यू तर झालेल्या रुग्णांची संख्या 13 इतकी आहे, अशी माहिती डॉ. ढगे यांनी दिली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या