ऑनलाइन शिक्षणातून विद्यार्थ्यांवर संस्कार होणार नाहीत
--नितीन शेटे
बाप्पा गणेश मंडळाचा सामाजिक उपक्रम
लातूर
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वत्र ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब केला जात असला तरी शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना त्यांच्या बोटाला धरून अनेक गोष्टी शिकवायच्या असतात. शिक्षणासोबतच संस्कार, नीतिमूल्ये शिकवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये संवाद होणे अपेक्षित आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीत संवाद हा खुंटतो म्हणून विद्यार्थ्यांवर संस्कार होणार नाहीत असे मत भारतीय शिक्षण संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे यांनी व्यक्त केले.
सध्या कोरोना आजारामुळे शाळा, महाविद्यालय बंद असल्या कारणाने विद्यार्थ्यांचा शिक्षणावर काय परिणाम होईल. यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पालकांचा संभ्रम व त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी शहरातील बाप्पा गणेश मंडळाच्या वतीने शिक्षण क्षेत्रावर आधारित संवादातून समृद्धीकडे या विशेष फेसबुक लाईव्ह परिसंवादाचे आयोजन शनिवारी सायंकाळी करण्यात आले होते.
या परिसंवादाला भारतीय शिक्षण संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे व सिंहगड शिक्षण संस्थेतील प्रा डॉ दीपक वक्रांनी यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होती.
पुढे बोलताना नितीन शेटे म्हणाले की शिक्षण ऑनलाईन जरी झाले तरी शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये संवाद महत्त्वाचा असतो. संवादातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, नीतिमूल्ये व समाजामध्ये कसे जगायचे हे शिकविले जाते. कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. या संकटाला घाबरून न जाता शिक्षणाचा संधी योग्य पद्धतीने सोडवता आल्या पाहिजेत. त्यासाठी शिक्षणाच्या अनेक पद्धतींचा अवलंब करावा लागेल, अनेक प्रयोग करावे लागतील व पारंपारिक शिक्षण पद्धती विकसित करावी लागेल. त्यासाठी समाजामध्ये दायित्व निर्माण करणारे शिक्षक व शिक्षण संस्था तयार झाल्या पाहिजेत. ऑनलाइन शिक्षणामुळे सर्व स्तरातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार नाही. कारण ऑनलाइन मध्ये वापरात येणाऱ्या तंत्रज्ञानाचे जेवढे फायदे आहेत तेवढेच दुष्परिणाम देखील आहेत. तंत्रज्ञानाचा विद्यार्थ्यांनी जर योग्य पद्धतीने वापर नाही केला तर वाईट परिणाम होतील संस्कार हिरावून घेणाऱ्या व दुष्ट प्रवृत्ती निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती तंत्रज्ञानातून विकसित होण्याचा धोका नाकारता येत नाही, असेही नितीन शेटे म्हणाले.
लॉकडाऊन नंतरची शिक्षणपद्धती याविषयी बोलताना प्रा डॉ दीपक वक्रांनी म्हणाले की कोरोनाचा या संकटाला संधी म्हणून बघितले तर संकट निघून जाईल. अशी संकटे भविष्यामध्ये येणारच आहेत म्हणून या संकटाचा विचार न करता याकडे संधी म्हणून बघावे.
कार्यक्रमाचे निवेदन प्रा विनोद चव्हाण यांनी केले. बाप्पा गणेश मंडळाचे पदाधिकारी आनंद राचट्टे व महेश कोळखैरे यांनी कोरोनाचा महामारीमुळे यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने व समाजोपयोगी सामाजिक उपक्रम राबवत साजरे करणार असल्याचे सांगत याची सुरुवात शिक्षण क्षेत्रावरील ऑनलाइन परिसंवादातून झाली असल्याचे सांगितले. व स्थलांतरीतांचा नोकरी संदर्भात व्यापाऱ्यांसोबत लवकरच पुढील ऑनलाईन सत्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणार असल्याचेही जाहीर केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंद राचट्टे व महेश कोळखैरे, छायाचित्रकार श्याम भट्टड, मेहबूब शेख आदींनी परिश्रम घेतले.
-फोटोकॅपशन-
बाप्पा गणेश मंडळाच्या वतीने शनिवारी सायंकाळी संवादातून समृद्धीकडे या ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर भारतीय शिक्षण संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे, प्रा डॉ दीपक वक्रानी व प्रा विनोद चव्हाण
छाया-- श्याम भट्टड
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.