प्रत्येक गावात दहनभूमी व दफनभूमी असली पाहिजे आढावा बैठकीत आ. अभिमन्यु पवार यांच्या सुचना







प्रत्येक गावात दहनभूमी व दफनभूमी असली पाहिजे आढावा बैठकीत आ. अभिमन्यु पवार यांच्या सुचना
प्रतिनिधी=मुख्तार मणियार औसा लातूर
औसा - प्रत्येक शेतकऱ्यांना शेतरस्ता असलाच पाहिजे शेतकऱ्यांना गाडीतून शेतीमाल घेवून येताना शेतरस्ते नाहीत याबाबत संबंधित विभागाने शेतकऱ्यांना शेतरस्ते व पाणंद रस्ते उपलब्ध करून द्यावे.शेतकऱ्यांना वेळ द्या गावात जावून त्यांच्या अडचणी समजून घेवून सोडवा. या कामात हलगर्जीपणा होता कामा नये जो या कामात हलगर्जीपणा करेल त्यांना लेखी नोटीस बजवा,प्रत्येक गावात दहनभूमी व दफनभूमी असली पाहिजे, अशा सुचना आमदार अभिमन्यू पवार यांनी दि.१९ जून रोजी औसा प्रशासकीय इमारत येथे आयोजित आढावा बैठकीत बोलताना पुढे म्हणाले सार्वजनिक दहनभूमी व दफनभूमी, सार्वजनिक व वैयक्तिक सिंचन विहीर शेतरस्ते व शिवरस्ता,स्वस्त धान्य पुरवठा, पाणीपुरवठा,वृक्ष लागवड, बांधकाम विभाग,भुकंपग्रस्त भागातील प्रश्न,औसा शहरातील रस्ते,घरकुल योजना आदिसह औसा विधानसभा मतदारसंघातील विविध यंत्रणाची हि आढावा बैठकऔसा प्रशासकीय इमारत येथे आयोजित करण्यात आली आढावा बैठकीत माहिती मिळाली.यावेळी या आढावा बैठकीत उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसिलदार शोभा पूजारी, गटविकास अधिकारी सुर्यकांत भुजबळ, मुख्याधिकारी तानाजी चव्हाण,नायब तहसीलदार वृषाली केसरकर,कृषी अधिकारी एम आर मोरे, संतोष अप्पा मुक्ता,पप्पु भाई शेख,तुराब देशमुख,आदिसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या