औसा शहरात व्यापा-यांनी आपली व्यापारी प्रतिष्ठाने दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय






औसा शहरात व्यापा-यांनी आपली व्यापारी प्रतिष्ठाने दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय
 प्रतिनिधी=मुख्तार मणियार औसा
औसा : औसा शहरात एकाच दिवशी कोरोनाचे आठ रुग्ण सापडल्याने शहरात मोठी खळबळ उडाली असून शहरातील व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तीने उद्या दि २३ व २४ जून रोजी स्वयंस्फूर्तीने आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे . शहरातील दोन कुटूंबांतील एकूण आठ व्यक्तिंना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल दि २१ जून रोजी आल्याने संपूर्ण शहर हादरुन गेले आहे . प्रशासनाने तातडीने हालचाली सुरु केल्या.शहरातील काही भाग सील केला असून या परिवारातील अन्य व्यक्तिंचा संपर्क आलेल्या व्यक्तिंचा शोध चालू असून ही यादी मोठी असून संपर्कात आलेल्यांची यादी वाढत जात असल्याने शहरातील धोका वाढला आहे.कोरोनाचाशहरातील वाढता प्रादुर्भाव पाहता औसा शहरात लाॅकडाऊन करण्यात यावे अशी मागणी करणा-या शिष्टमंडळाला जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लाॅकडाऊनचे अनलॉक करण्यासाठी व जनतेला नियम पाळून सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू करण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांची माहिती देऊन 
प्रशासन लॉकडाऊन करू शकत नसल्याचे सांगितले जिल्हाधिका-यानी लॉकडाऊनला नकार दिल्यानंतर व्यापारी असोसिएशनने दोन दिवस आपली व्यापारी प्रतिष्ठाने स्वंयस्फूरतीने बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या