मेडीकलच्या धर्तीवर वार्षिक परिक्षा घ्याव्यात
माजी आ.कव्हेकर यांची मुख्यमंत्री व राज्यपालांकडे मागणी
लातूर दि.15/06/2020
देशात कोरोनामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्याप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रातही अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने 10 वी व पदवीच्या परिक्षा रद्द केल्याचे आपण वाचले आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्येही तोच निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला होता. त्या निर्णयाला प्राध्यापक व प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष प्रा.नंदकुमार निकम, एम.फुक्टोचे सरचिटणीस डॉ.ए.पी.लवांडे, कांही संस्थाचालक, अनेक शैक्षणिक क्षेत्रातील अभ्यासक, विचारवंत यांनी विरोध केलेला आहे. ते विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने योग्य असून मेडीकल कॉलेजच्या परिक्षा ज्या पध्दतीने घेतल्या जाणार आहेत. त्याच पध्दतीने याही परिक्षा घेतल्या जाव्यात, अशी लेखी मागणी महाराष्ट्रातील प्रसिध्द शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी विनापरिक्षा पदवीच्या डिग्रीला परदेशात, देशात पदव्युत्तर प्रवेशासाठी व विविध नोकर्यामध्ये महत्त्व राहणार नाही. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. त्यामुळे विद्यापीठाला डावलून हा निर्णय घेणे योग्य नाही. आणि हा निर्णय कोर्टामध्ये कायदेशीर स्तरावर टिकणार नाही. कारण शासनाने याबाबत वटहुकुम अथवा जी.आर.काढलेला नाही. असे प्रख्यात कायदे तज्ज्ञ अॅड.एस.आर.जैन यांनी मत मांडलेले आहेत. तेंव्हा विद्यापीठाचे प्राध्यापक, प्राचार्य यांना विश्वासात घेवूनच परिक्षा घ्याव्यात, अशी विनंतीही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी राज्यशासनाकडे केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.