निवडणूक खर्च निरीक्षक यांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर · निवडणूक खर्च विषयक तक्रारी नोंदविण्याचे आवाहन · मद्य, रोकड, मोफत भेटवस्तू वाटपाबाबत करता येणार तक्रार

 निवडणूक खर्च निरीक्षक यांचे भ्रमणध्वनी क्रमांक जाहीर

·        निवडणूक खर्च विषयक तक्रारी नोंदविण्याचे आवाहन


·        मद्य, रोकड, मोफत भेटवस्तू वाटपाबाबत करता येणार तक्रार




लातूर, दि. १५ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमेदवार, राजकीय पक्षाकडून प्रचारासाठी अनधिकृत बाबींचा वापर केला जात असल्यास याबाबतची माहिती भ्रमणध्वनी क्रमांकावर कळविण्याचे आवाहन निवडणूक खर्च निरीक्षक काकराला प्रसांत कुमार आणि डॉ. रामसिंह गुर्जर यांनी केले आहे. श्री. काकराला यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९२७०१५४५८४ असून डॉ. गुर्जर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७६२०५५२८६१ असा आहे.


भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार लातूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मतदारांवरविविध प्रकारची प्रलोभने दाखविण्यासाठी मद्यवाटप, पैशांचे वाटप, मोफत भेटवस्तूंचे वाटप यासारख्या अनधिकृत प्रकारांचा वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे असे प्रकार आढळून आल्यास नागरिकांनी याबाबतची माहिती निवडणूक खर्च निरीक्षक यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर अथवा सी-व्हीजील ॲपद्वारे नोंदवावी, असे आवाहन निवडणूक खर्च निरीक्षक काकराला प्रसांत कुमार आणि डॉ. रामसिंह गुर्जर यांनी केले आहे.


***** 

Collector & District Magistrate, Latur

Latur Police Department

Chief Electoral Officer Maharashtra

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या