मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यातून मुस्लिम आमदार होऊ शकतो लातूरातून का नाही
मुस्लिमांचा पहिला आमदार म्हणून संधी द्या-अख्तर मिस्त्री
लातूर : मराठवाड्यातील प्रत्येक
जिल्ह्यातून मुस्लिम आमदार झाला पण सर्वाधिक मुस्लिम मतदार संख्या असताना लातूर मधून एकदाही मुस्लिम आमदार झाला नाही किंवा होऊ दिला नाही, मतदारांनी मला लातूर जिल्ह्यातील पहिला मुस्लिम आमदार म्हणून निवडून द्यावे असे आवाहन अपक्ष उमेदवार माजी महापौर अख्तर मिस्त्री यांनी केले.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लातूरचे माजी महापौर अख्तर
मिस्त्री हे निवडणूक लढवीत आहेत या निवडणुकीत त्यांचे चिन्ह पाटी हे आहे. मराठवाड्यातील नांदेड, जालना, संभाजी नगर, परभणी, धाराशिव अशा प्रत्येक जिल्ह्यातून मागील काळात अनेक वेळा मुस्लिमांचे आमदार निवडून दिले गेले मात्र लातूर जिल्हा असा हा एकमेव आहे या जिल्ह्यामध्ये मुस्लिम मतदारांची संख्या सर्वाधिक असताना देखील येथील नेतृत्वाने या शहरातून मुस्लिमांचा आमदार एकदाही होऊ दिला नाही, तेव्हा या मतदारसंघातील मतदारांनी मला मते देऊन
लातूर शहरातील वेगळ्या गल्ली, वस्तीमध्ये जाऊन ते सभा घेत आहे त्यांच्या सभेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लातूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची २०१५ मध्ये टंचाई निर्माण झाली होती त्यावेळी लातूरला रेल्वेने पाणी आणले हे केवळ माझ्यामुळे घडले आहे, तत्कालीन राष्ट्रपती यांच्या
लातूरला रेल्वेने पाणी मिळाले, त्यांच्याकडे मी थेट पाठपुरावा करण्यासाठी गेलो होतो, माझ्या भेटीनंतरच त्यांनी व तत्कालीन मंत्री व्यंकय्या नायडू यांनी लातूरला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले असा दावा अख्तर मिस्त्री यांनी केला आहे. तेलंगणाच्या धर्तीवर मी महापौर असताना लातूर शहरातील रात्रीची स्वच्छता पहिल्यांदा चालू केली, मला नागरी समस्यांची जाणीव आहे निवडून द्या त्या प्रामाणिकपणे सोडवेन अशी हमी त्यांनी दिली आहे. माझी उमेदवारी मत
जिल्ह्यातील पहिला मुस्लिम आमदार करावे ती ताकद आपल्या मतदानात आहे अशी अपेक्षा माजी महापौर अपक्ष उमेदवार अख्तर मिस्त्री यांनी व्यक्त केली आहे.
आपणास मानणाऱ्या मतदारांची संख्याच एवढी भारी आहे की आपण सर्वांनी मला मतदान केले तर मी आमदार होऊ शकतो तेव्हा मतदारांनी जास्तीत जास्त मतं माझे निवडणूक चिन्ह पाटी यावर मतदान करावे असे आवाहन मिस्त्री यांनी केले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.