माझ्यावर बिनबुडाचे आरोप करतांना एक सायकलचे पंक्चर काढणारा फॉर्च्युनरमधून कसा फिरत हे सर्वांना माहीत
माझे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठे होत असतील तर मला त्याचा अभिमान आहे
.....
आमदार अभिमन्यू पवारांचे दिनकर माने यांना जशास तसे उत्तर
....
पराभवाची चाहूल लागली असल्याने विरोधकांकडून बेछूट आरोप... आमदार अभिमन्यू पवार
औसा- विरोधी उमेदवाराकडे मतदारासमोर जाऊन मते मागण्यासारखे कांहीच नसल्याने ते माझ्यावर आणि माझ्या कुटुंबियांसह कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्यावर बिनबुडाचे बेछूट आरोप करीत आहेत. कष्ट करून जिद्दीने कोणी मोठे होत असेल तर त्याचा मला आनंद आणि अभिमान आहे. तुम्हाला तुमच्या पुतन्यालाही मोठे करता आले नाही. कार्यकर्ते मोठे करायला दानत लागते. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करतांना एक सायकलचे पंक्चर काढणारा फॉर्च्युनरमधून कसा फिरतो, कोट्यवधींचा मालक कसा होतो हे सर्वांना माहीत असल्याने तुम्ही केलेले आरोप हास्यास्पद आहेत. तुम्हाला तुमच्या पराभवाची चाहूल लागल्याने तुम्ही भांबावून खोटं बोल पण रेटून बोलत आहात. ज्या कंपन्या आणि मालमत्तांच्या चिटोऱ्या दाखवीत माझ्यावर आरोप केले त्या कंपन्यात एक रुपयाचाही व्यवहार मी आणि माझ्या कुटुंबाने केला नाही. असा पलटवार भाजप महायुतीचे उमेदवार आमदार अभिमन्यू पवार यांनी महाविकास अघडीचे सर्व आरोप फेटाळून लावले. बुधवारी (दि.१३) पक्षप्रवेश केलेल्या आणि भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना औशात ते बोलत होते.
महाविकास अघडीचे दिनकर माने यांनी मंगळवारी कासार सिरसी येथे झालेल्या सभेत आमदार अभिमन्यू पवारांवर गंभीर आरोप करीत त्यांच्या प्रॉपर्टीची कागदपत्रे दाखविली होती. माने यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करताना आमदार अभिमन्यू पवारांनी सांगितले की, ज्या प्रॉपर्टी आणि कंपन्यांचे दाखले देऊन विरोधी उमेदवाराने माझ्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत ते साफ खोटे आहे. माझ्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी कष्टाने, मेहनतीने आणि निर्वसनी राहून प्रगती करीत असतील तर त्यात वावगे काय आहे? तुम्ही तुमच्या एक जवळच्या लोकांना कधी मोठे होऊ दिले नाही त्यामुळे तुमच्या जवळ आलेले अनेकजण बरबाद झाले. एक सायकलचे पंक्चर काढणारा माणूस आज फॉर्च्युनर मध्ये फिरतो. कोटींमध्ये त्याची प्रॉपर्टी कशी होते? ज्या कंपन्यात माझे, माझ्या पत्नीचे व मुलाचे नाव आहे त्यामध्ये आम्ही एक रुपयाचाही व्यवहार केलेला नाही कार्यकर्ते कंपनी स्थापन करून ते मोठे होत असतील तर मला याचा अभिमानच असल्याचे सांगत तुम्ही पतसंस्था स्थापन करून कोट्यवधींचा गफळा केला. अनेक गरीब कुटुंबाची जमीन लिहून घेऊन त्यांना व्याजात बुडविले. कार्यकर्त्यांना चांगले शिकविण्यापेक्षा त्यांना दारूच्या व्यसनात गुंतवले.मी माझ्या लोकांना भजनाचा फड दाखविला तुम्ही तमाशाचा फड. लातूर औसा मार्ग कोणी आणि कशासाठी अडविला होता हे सर्वांना माहिती आहे. गुत्तेदाराला कमिशन मागितल्याने काम रखडले आणि या रोडवर जवळपास शंभर ते दीडशे लोकांचा अपघातात बळी गेला. त्या अपघातात दगावलेल्या कुटुंबाचा तळतळाट तुम्हाला लागल्याशिवाय राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले. जो माणूस स्वतःच्या पुतण्याला मोठे करू शकला नाही तो कार्यकर्त्यांना काय मोठे करेल असा टोला त्यांनी माने यांना लगावला. माझ्यात संयम आहे म्हणून कोणी त्याला कमजोरी समजून काहीही बेताल वक्तव्य करीत असेल तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.