जिल्हयात पशुधन वाढविण्यासाठी नाविन्यपुर्ण योजना आखून पशुधनाचे संवर्धन पालकमंत्री अमित देशमुख





वृत्त क्र.490                                                                                                              दिनांक:-22 जून 2020

 

जिल्हयात पशुधन वाढविण्यासाठी नाविन्यपुर्ण

योजना आखून पशुधनाचे संवर्धन करावे

                                -पालकमंत्री अमित देशमुख

* मत्सव्यवसाय विभागाने जिल्हयात मत्स वाढीसाठी प्रयत्न करावेत

 

*जिल्हयातील रेशीम शेतीस प्रोत्साहन देणार

 

 

लातूर,दि.22(जिमाका):- जिल्हयातील पशुधन वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने नाविन्यपुर्ण योजना आखून पशुधनाचे संवर्धन करावे तसेच जिल्हयात गोटफार्म, डेअरीफार्म व पोल्ट्रीफार्मचे  मॉडेल तयार करण्याच्या सूचना राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या.

शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित पशुसवंर्धन , मत्सव्यवसाय व रेशीम शेती आढावा बैठकीत केले. या बैठकीस पशुधन विभागाचे पशुवैद्यकीय अधिकारी  डॉ.शैलेश केंडे , डॉ. बि.यु. बोधनकर , डॉ. विनोद दुधाळे , डॉ. राजकुमार पडीले, जिल्हा रेशीम अधिकारी श्री.बागवे  उपस्थित होते.

या बैठकीस मार्गदर्शन करताना पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की , जिल्हयातील पशुधन वाढविण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने नाविन्यपुर्ण योजना आखून, जिल्हयात गोटफार्म, डेअरीफार्म व पोल्ट्रीफार्मचे मॉडेल तयार करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हयात पशुसंवर्धनाच्या विविध योजना राबवून शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय करण्यास चालना दयावी. तसेच सुशिक्षित बेकार युवकांसाठी हब तयार करावा व बचत गटांनाही प्रोत्साहन दयावे अशा यावेळी पालकमंत्री अमित देशमुख यांनी सूचना दिल्या.

या वर्षी पावसाचे आगमन वेळेवर झाले आहे, जिल्हयातील मत्स व्यवसाय विभागाने  साठवण तलावातील पाणीसाठयामध्ये मत्स्यउत्पादकतेच्या तुलनेनुसार मत्स्यवाढीसाठी प्रयत्न करावे.   तसेच मत्स्यवाढीसाठी  स्वतंत्र असा प्रस्ताव शासनास सादर करावा असे निर्देश पालकमंत्री श्री. देशमुख यांनी दिले. जिल्हयात रेशीम उद्योगाला वाव असून रेशीम शेती उद्योगाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. रेशीम शेती वाढीचा संबंधीत विभागाने जाणीवपुर्वक प्रयत्न करावा.आपल्या काही अडीअडचणी बाबत ताबडतोबीने प्रस्ताव दाखल करावा असे  त्यांनी  सांगितले.

या आयोजित बैठकीस पशुधन विभागाचे पशुधन विकास अधिकारी ,मत्सव्यवसाय विकास अधिकारी व रेशीम विकास अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या