*यंदाच्या गणेशोत्सवात मिरवणुका नाहीत, मुख्यमंत्र्यांची मंडळांसोबत बैठक**
🔰 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणपती मंडळांसोबत बैठक घेतली. यंदाचा उत्सव हा धुमधडाक्यात साजरा करता येणार नाही.
✅ कोरोनाचा धोका संपलेला नाही, त्यामुळे गर्दी करता येणार नाही तसंच मिरवणुकाही काढता येणार नाहीत. कोरोनामुळे सर्व प्रकारची दक्षता घेऊनच हा उत्सव साजरा करावा लागेल, असं मुख्यमंत्री या बैठकीत म्हणाले.
✅ 'ही साधेपणाची चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. आपण महाराष्ट्रात पुनःश्च हरिओम करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. त्यामुळे हा उत्सव साजरा करताना देखील, आपल्याला चौकटीत राहून उत्सव साजरा करावा लागेल.
✅ कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी आपण घेऊ, पण उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवावेच लागेल. संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव आपण साजरा करू,यासाठीचा कार्यक्रम निश्चित करून आपण हा सण साजरा करू', असे ही मुख्यमंत्री म्हणाले.
✅ गणेश मंडळांच्यामार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल, याचा आपण विचार करू आणि हा उत्सव साजरा करू. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.