नियोजित ट्रॉमा केअर व जलशुद्धीकरण प्रकल्पाची आ.धिरज विलासराव देशमुख यांच्याकडून पाहणी.
लातूर:-- लातूर ग्रामीण मतदार संघाचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी मुरुड येथे नियोजित ट्रॉमा केअर सेंटरच्या जागेची व मुरुडकरांना शुध्द पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत मोठा आधार ठरणा-या जलशुद्धीकरण प्रकल्प कामाची प्रत्यक्षात जाऊन दिनांक 9/ 6 /2020 रोजी पाहणी केली. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस अधिकच जटील होत आहे. अशा वेळी नागरिकांना पिण्यास योग्य व स्वच्छ पाणी देणे हे आपले कर्तव्य आहे. या भावनेतून राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत मुरुड येथे उभारण्यात येत असलेल्या जलशुद्धीकरण प्रकल्प कामाची पाहणी करून मांजरा धरण ते मुरुड पर्यंत सुरू असलेल्या कायमस्वरूपी पाइपलाइनच्या कामाचा आढावा आ. धिरज विलासराव देशमुख यांनी घेतला. या सोबत ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्यासाठी जीवनदायी ठरणार्या मुरुड येथील नियोजित ट्राॅमा केअर सेंटरसाठीच्या जागेची पाहणी करून या संदर्भात योग्य त्या सूचना आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी ज्येष्ठ नेते तथा जि.प.सदस्य दिलीप (दादा) नाडे,ट्वेंटीवन शुगरचे समन्वयक विजय देशमुख,डॉ. दिनेश नवगिरे, रवींद्र काळे, डॉ. लक्ष्मन देशमुख, सर्व वैद्यकीय अधिकारी कर्मचारी, डेप्युटी इंजि.सोनटक्के, जे.ई. आवळे, आकाश कणसे, लक्ष्मीकांत नवसे, अमर मोरे, यशवंतराव नाडे, समाज कल्याण उपायुक्त खमीतकर, महादेव गोमारे, बी.एस पटाडे, राजेंद्र मस्के, चंद्रकांत मोरे, भारत लाड, समाधान गायकवाड, अनिल नाडे, राम गोरे आदींची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.