औराद शहाजानी पंचक्रोशीतील रक्तदात्यांचा महाराष्ट्रातील नवा विक्रम..
आम्ही रक्तदाते च्या संकल्पनेतुन रक्तदाता दिनारोजी ५०३ रक्तदान करुन अनोखा विक्रम झाला नोंद.
औराद शहाजानी (सा.वा.)
दिनांक १६
जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने औराद शहाजानी पंचक्रोशीतील ग्रामीण भागातून, एकाच दिवशी महाराष्ट्रातील एकाच दिवसाचे सारे विक्रम मोडीत काढून, रक्तदानाच्या इतिहासामध्ये रक्तपेढीच्या नोंदीनुसार ५०३ रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.
ग्रामिण भागातील या रक्तदान चळवळीमुळे एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. 'आम्ही रक्तदाते' या संकल्पेने अंतर्गत औराद शहाजानी, सावरी, तगरखेडा, मानेजळगाव, शेळगी या पंचक्रोशीतून उत्तम प्रतिसाद मिळाला.
रक्तपेढी च्या उपलब्ध साधन सुविधेच्या अभावामुळे काही रक्तदात्यांना पुढच्या टप्प्यातील रक्तदानासाठी थांबवावे लागले असा अभूतपुर्व प्रतिसाद मिळाला. रक्तदानाचे महत्त्व, त्याचे फायदे तळागाळातील शेवटच्या माणसाला प्रत्यक्ष भेटून समजावून सांगण्यात आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून "आम्ही रक्तदाते" या ग्रुपच्या वतीने उदंड प्रतिसाद लाभला. सर्वच जाती धर्मातील लोकांनी विशेषतः *मुस्लिम महिला भगिनींनी रक्तदान करुन उत्स्फूर्त सहभाग नोंदविला तसेच मुस्लीम मौलवी* , दलीत समाजबांधव व कर्तव्यावर असलेले कोरोना योध्दा महावितरणचे लाईनमन सचिन जाधव , सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर सुर्यवंशी , पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गोंड यांनी व अनेक कर्मचारी व सर्व समाजातील नागरीकांनी रक्तदान करुन नकळत एका विक्रमाला गवसणी घातली गेली.
यासाठी माऊली ब्लड बँक, भालचंद्र ब्लड बँक, शासकीय बँक यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच गावातील भरपुर प्रमाणात लोकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य केले व जवळपास ३०० रक्तदात्यांना औराद नगरीतील एका तरुन व्यापाऱ्याने पुढाकार घेत स्वखर्चाने मास्क , सॅनिटायझर व हँडवॉश भेट देण्यात आली व रक्तदान बुथमध्ये प्रमुख सहकार्य म्हणुन आशाताई , अंगणवाडीताई अशा अनेकांचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मोलाचे सहकार्य लाभले.
खरे पाहता हे श्रेय सामाजिक बांधिलकी जोपासून माणुसकीसाठी काम करणाऱ्या सर्वांचेच आहे, अशी भावना या रक्तदान चळवळीतून जनतेमधे निर्माण झाली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.