कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने जनतेची कामे करावे
अभिमन्यु पवार
प्रतिनिधी=मुख्तार मणियार औसा
औसा=कोकळगाव येथे कासार शिरसी मंडळाची कार्यकारिणी नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले यावेळी ग्रामिण भागातील युवकांनी समक्ष बनावे ,त्यांनी स्वत:च्या पायावर उभे राहिले पाहिजे, गावात राहूनच आई वडिलांची काळजी घेत ,गावातच अनेक उद्योग सुरू करावेत त्यामुळे शहरांकडे जाणारा लोंढा कमी होईलच आणि ग्रामिण भागातील, उद्योगांना चालना मिळेल असे आवाहन अभिमन्यु पवार यांनी कोकळगाव येथे कासार शिरसी मंडळाची कार्यकारिणी नियुक्ती पत्राचे वाटप करताना बोलत होते.यावेळी कासार शिरसी मंडळ अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, पंचायत समिती सदस्य जीलानी बागवान , दिंगबर घोडके, सुरेश सगर,आदिची उपस्थिती होती.महिलांनी अनेक उद्योग धंदे सुरू करावे .डाळमिल,आईलमिल , रेशीम उद्योग या सारखे उद्योग सुरू करून तरूणांनी ग्रामिण भागातील विकासास प्राध्यान द्यावे .किल्लारी कारखाना सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.नरेंद्र मोदी यांनी जनते साठी केलेलीं कामे जनते पर्यंत पोंहोचले पाहिजे कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने जनतेची कामे करावे असेही यावेळी सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.