राज्यातील शासकीय कार्यालयातील दिव्यांग अनुशेष
भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार
– ना. अमित विलासराव देशमुख
लातूर प्रतिनिधी –
राज्यातील विविध शासकीय कार्यालयात दिव्यांग व्यक्तीचा अनुशेष भरून काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिव्यांग व्यक्ती साठी काम करणाऱ्या संवेदना संस्था तसेच सक्षम संघटना शिष्टमंडळाला दिले.
लातूरच्या शासकीय विश्रामगृहावर शनिवार २० जून रोजी दुपारी दिव्यांग व्यक्ती विकासासाठी काम करणाऱ्या संवेदना संस्था तसेच सक्षम संघटनेच्या शिष्टमंडळाने ना. अमित विलासराव देशमुख यांची भेट घेऊन राज्यातील विविध शासकीय कार्यालयातील दिव्यांग अनुशेष भरावा यासह दिव्यांग प्रवर्गाच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली .
यावेळी संवेदना संस्थेचे डॉ. राजेश पाटील, सक्षम संघटनेचे सुरेश पाटील, संतोष जोशी, व्यकंट लामजणे, पत्रकार अरूण समुद्रे यांच्यासह दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संस्थाचे अन्य सदस्य
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.