लातूरच्या शासकीय विश्रामगृह प्रवेशद्वारात
ऑटोमेटिक सेन्सर सेनीटायझर मशीन कार्यान्वित,
पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्यासमोर कंपनीकडून प्रात्यक्षिक
लातूर प्रतिनिधी –
कोविड १९ पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञान वापरून हात निर्जंतुक करण्यासाठी बनविण्यात आलेली सेनीटायझर मशीन लातूरच्या शासकीय विश्रामगृह प्रवेशद्वारात बसविण्यात आली आहे. या मशीनचे प्रात्यक्षिक शनिवार दिनांक २० जून रोजी दुपारी आढावा बैठकीनंतर पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांना कांता ट्रेडर्स कडून दाखविण्यात आले.
मशीन जवळ हात नेताच सेन्सर अक्टीव होऊन मशीन मधून स्प्रे बाहेर येऊन मशीनला स्पर्श न करता हाताचे निर्जंतुकीकरण होते. एका वेळेस या मशीन मधील स्प्रे च्या माध्यमातून जवळपास ६०० लोकांचे हात सेनीटाइझ करण्याची क्षमता असून या मशीनचा वापर कार्यालय, बँक, तसेच अधिक नागरिकांचा वावर असलेल्या पब्लिक प्लेस मध्ये केला गेल्यास कोविड १९ संसर्ग रोखण्यासाठी मदत होईल. हाताचा स्पर्श न करता केवळ आय सेन्सर माध्यमातून काम करणाऱ्या या मशीनचे ना. अमित विलासराव देशमुख यांनी कौतुक केले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.