संभाजीरावांना पुन्हा राज्याच्या राजकारणात काम करण्याची संधी मिळावी भा.ज.यु.मो.तर्फे रक्तदान शिबिरः माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर






संभाजीरावांना पुन्हा राज्याच्या राजकारणात काम करण्याची संधी मिळावी
भा.ज.यु.मो.तर्फे रक्तदान शिबिरः माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर दि.20-06-2020
आ.संभाजीराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. आ.संभाजीराव पाटील निलंगेकर व माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या घराण्याचे सबंध 1972 पासून कायम आहेत. संभाजीरावांचे वडील दिलीपराव पाटील यांना विधानसभेसाठी उभे करण्यात आले होते.त्यावेळी त्यांना राज्यात दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यानंतर 2004 मध्ये रूपाताई पाटील यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळाली. त्यांनाही परिवारातील भगिणी समजून सहकार्य केले आणि निवडून आनले. त्यांची धुरा आता माजी कामगार मंत्री तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर हे सक्षमपणे सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांना या वाढदिवसानिमित्त पुन्हा राज्याच्या राजकारणात काम करण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्‍त केली.
यावेळी ते भाजपाच्यावतीने मजगे नगर भागातील महाराष्ट्र विद्यालयात माजी कामगार मंत्री तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात रक्‍तदान शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी महापौर सुरेश पवार, निळकंठराव पवार, संभाजीराव पाटील, नगरसेवक बालाजी शेळके, नगरसेविका सरिता राजगिरे,विनोद जाधव, बापूसाहेब गोरे, प्राचार्य गोविंद शिंदे, गणेश गवारे, संतोष जाधव, बसवेश्‍वर मंडल प्रमुख संजय गिर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. या रक्‍तदान शिबीरात तब्बल 70 जणांनी रक्‍तदान केले.  
यावेळी बोलताना भाजपा नेते माजी आ.कव्हेकर म्हणाले की, भाजपाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. सध्या कोरोनाचे संकट असल्यामुळे रूग्णांची संख्या वाढत आहे. या वाढत्या रूग्णांना सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून आधार मिळावा यासाठी रक्‍तदान शिबिरासारखे उपक्रम राबविले जात आहेत. त्या उपक्रमाचाच हा एक भाग असल्याचेही ते म्हणाले.
माजी कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजित शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र विद्यालयात घेण्यात आलेल्यास शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी शिवशरणप्पा आंबुलगे, गणेश कदम, विनायकराव पाटील, अफरोज पठाण, कमलाकर कदम, केंद्रे, सुंर्यवंशी,बस्वराज सुलगुडले, सागर मांडे, निखील शेळके, कैलास आंबेगावे, अफरीन खान, महादेव पिटले, आकाश पिटले, शुभम पाटील, पांडूरंग रूकमे, श्रीमंत कसपटे, राजकुमार शेटे, अक्षय पवार, आकाश बजाज, मन्मथ बोळेगावे, उमाकांत स्वामी, डॉ.प्रसार मिरजे यांच्यासह भाजपा व भाजपा युवा मोर्च्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या