वृत्त
आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा
लातूर ः जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा वाढदिवस मयुरबन सोसायटी येथे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. आ.निलंगेकर यांचे स्विय सहाय्यक सुहास जोशी यांच्या पुढाकारातून मयुरबन सोसायटीत 100 वृक्षांचे रोपन करण्यात आले. याचा शुभारंभ मनपा गटनेते अॅड.शैलेश गोजमगुंडे व मनिष बंडेवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
जिल्ह्यात वनक्षेत्र कमी असून याचा परिणाम पर्जन्यमानावर होत आहे. ही बाब लक्षात घेवून माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सातत्याने वृक्षारोपन करण्याची मोहिम राबविण्यात यावी असे आवाहन केलेले आहे. त्याचबरोबर पालकमंत्री पदाचा भार सांभाळत असतांना आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी वेगवेगळे उपक्रम राबवत शासकीय यंत्रणेलाही वनक्षेत्र वाढविण्यासाठी सुचना करून त्याचा पाठपुरावाही केलेला होता. आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांचे स्विय सहाय्यक सुहास जोशी यांच्या पुढाकारातून मयुरबन सोसायटी येथे वृक्षारोपनाची मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. या मोहिमेचा मनपाचे गटनेते अॅड.शैलेश गोजमगुंडे तसेच भाजपा प्रदेश व्यापारी आघाडीचे मनिष बंडेवार यांच्या उपस्थितीत वृक्षारोपन करून करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी केवळ वृक्षारोपन करून ही मोहिम पुर्ण होत नाही तर त्या वृक्षांचे संगोपन करून त्यांचा वाढदिवसही दरवर्षी साजरा करावा असे आवाहन मयुरबन सोसायटीत रहिवाशांना केले. सुहास जोशी यांच्या पुढकारातून राबविण्यात आलेली हि मोहीम केवळ मयुरबन सोसायटीपुरती मर्यादीत न राहता शहराच्या विविध भागांमध्ये असलेल्या सोसायटींनी सुध्दा याचे अनुकरण करण्यासाठी जनजागृती व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली. वाढदिवसाचे औचित्य साधून सुरू करण्यात आलेल्या वृक्षारोपन मोहिमेत तब्बल 100 वृक्षांचे रोपण रहिवाशांच्यावतीने दिवसभरात करण्यात आले.
यावेळी सोसायटीतील रहिवासी प्रा.राजेश विभुते, मनोज स्वामी, लक्ष्मीकांत कोटलवार, विलास मामडगे आदिंसह सोसायटीतील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.