*सोशल एज्यूकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे आभार-खालेद अन्सारी उत्तरप्रदेश....*
लौट आयेगी खुशियाँ,अभी कुछ गमो का शोर है.जरा संभलकर रहो अज़ीज़ों,ये इम्तिहानो का दौर है..!
*विशेष रिपोर्ट-अॅड.इकबाल शेख,औसा.*
लॉकडाऊनच्या काळात बाराबंकी उत्तरप्रदेश येथील 17 परीवारातील एकूण 120 लोकं सारोळा रोड येथील चक्रधर शाळेच्या पाठीमागे पाल ठोकून राहत होते.ते मागील आठ वर्षापासून व्यवसायानिमित्त दरवर्षी औसा येथे येवून शोभेच्या वस्तू,फूलांचा व्यवसाय करून उपजीविका भागवत असत.परंतू यावेळेस ते औसा येथे आले आणि लॉकडाऊन ला सुरूवात झाली.त्यांना आता व्यवसाय कसं करायचं आणि पोट कसं भरायचं हा मोठा प्रश्न भेडसावू लागलं परंतू कांही दानशूर व्यक्ति,सामाजिक संस्था यांनी या लोकांना मदतीचा हाथ दिला.त्यातीलच एक सामाजिक संस्था सोशल एज्यूकेशन अँड वेल्फेअर सोसायटी औसा ने त्यांना लॉकडाऊनच्या काळात तीन वेळा राशन किट,गरजेच्या वस्तू तसेच कपडे देवून व रमजानच्या महिन्यात हि त्यांना राशन पूरवून त्यांची सोय केली.
सोशल एज्यूकेशन अँड वेल्फेअर सोसायटी औसा यांच्या तर्फे कोरोना च्या या संकटकालीन परिस्थितीत व संचारबंदी च्या काळात गोरगरीब लोकांचे होणारे हाल आणि उपासमार टाळण्यासाठी सर्वधर्मीय गरीब व गरजूवंताना सोशल डिस्टंसिंगची काटेकोर अंमलबजावणी करत तीन टप्प्यात 850 राशन (किराणा माल) किट वाटप करण्यात आले.या कार्यासाठी संस्थेला भरपूर जणांनी देणगीच्या स्वरूपात मदत केली.आता लॉकडाऊन शिथिल झालं परंतू या लोकांचा व्यवसाय तग धरू शकलं नाही,त्यांनी बनविलेली फूलं कोणीही विकत घ्यायलां तयार नाही,त्यांना आता पोटाची चिंता सतावत आहे त्यातच त्यांचा मुखिया खालिद अन्सारी यांनी मला मागील आठवड्यात फोन केला वकिलसहाब राशन खत्म हो चूका है,कूछ मदत करें तो अच्छा होगा और हमारे लिये कोई काम भी होगा तो देखोे,हम कोई भी काम करने को तयार हैं,यहाँतक हमाली भी हम कर लेंगे.एवढं बोलून तो शांत झाला,मी लगेच त्याला होकार दिला कि राशन उद्या सकाळीच आमच्या सर्व सहकारी व मित्रांना सांगून,सोय करून उपलब्ध करून देतो.त्यानंतर लगेच मी कामाला लागलो.आमचे सोशल चे सर्व पदाधिकारी तसेच माझे बालमित्र पटेल बंधू यांच्याशी चर्चा करून राशन पूरवठा बद्दल सांगितलो,सर्वांनी होकार दिला आणि सकाळी त्यांना बोलावून राशन द्या असं सांगितले व त्यांना कामाला लावण्यासाठी ही सर्वांनी प्रयत्न करुत असे ही सांगितले.तद्नंतर दूस-या दिवशी त्यांना लगेच राशन उपलब्ध करून देण्यात आलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना आमचे सहकारी मित्रं हुसेन पटेल व दौलत देशमुख यांनी त्यांना राहण्याच्या सोयी सहीत आणि प्रत्येकी महिना बारा हजार पगारीवर काम पण उपलब्ध करून दिलं ते लातूर येथील नामांकित कंपनी टिना अॉईल मिल येथे.आज याच आनंदात खालिद भाईंनी फोन केला सहाब कहाँपर हैं आप,आपसे अभी मिलना हैं.मी म्हटलं आवो दस मिनिट में स्कूल पर वहाँ मिलेंगे.लगेच खालिद अन्सारी,नियामत अन्सारी भेटायला आले आणि सोबत त्यांनी तयार केलेल्या फूलदाणी भेट म्हणून आम्हाला देण्यासाठी घेवून आले.मी म्हटलं क्या खालिद भाई इसकी क्या जरूरत थी.तेंव्हा त्यांने दोनच शब्दात मला भावूक केलं म्हटलं सहाब आप सब लोंगों कि वजह से तो हम आज जिंदा हैं,आप सभी लोग फरीश्तें हैं,फरिश्ते.आप ने तीन महिने हमें राशन दिया और अब हमारा रोजी रोटी का मसला भी हल किया.तेंव्हा मी त्याला लगेच म्हटलं खालेद भाई देनेवाली जात अल्लाह कि है,अल्लाह ने दिया हमने आप तक पहूँचाया.बाकी आपकी किस्मत और सभी कि दूवा,अल्लाह के करम से आपका सभी मसला हल हो गया.खरंच आज आम्हाला या लोकांच्या चेह-यावरील आनंद बघून संस्थेमार्फत अजून कांही करता येईल का याची उर्मी आम्हाला मिळाली.
या कामी संस्थेचे सचिव इंजि.अजहरूल्ला हाश्मी,अध्यक्ष प्रा.एल.एम.पटेल,मजहर पटेल,अॅड.इकबाल शेख,अक्रम खान,डॉ.जिलानी पटेल,हुसेन पटेल,अजमत पटेल,अॅड.फेरोज पठाण,मुज्जकीर काझी,अब्दूल्ला शेख,इम्रान शेख,दौलत देशमुख,नईम शेख आणि माझे परममित्र रिजवान पटेल,जिशान पटेल यांचे मोलाचे सहकार्य आणि असंख्य देणगीदारांची मदत चांगल्या कार्यासाठी एक उमेद ठरली,त्यासाठी सर्वांचे आभार आणि पूढील समाजसेवेसाठी शुभेच्छा.
*मुठ्ठियों में क़ैद हैं जो खुशिया वो बांट दो यारो,ये हथेलियां तो इक दिन वैसे भी खुल ही जानी हैं...।*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.