योगसाधनेतून राष्ट्र, समाज, मानवता उभारणीचे काम केले जागतिक योग दिन ः माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे प्रतिपादन







योगसाधनेतून राष्ट्र, समाज, मानवता उभारणीचे काम केले
जागतिक योग दिन ः माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे प्रतिपादन
लातूर दि.21-06-2020
योगाच्या माध्यमातून आपले आरोग्य अबाधित ठेवण्याबरोबरच वैचारिक व अध्यात्मिक प्रेरणा देण्याचे काम केले जाते. हे काम रामदेव बाबा, स्वामी देवव्रत्तजी आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 40 ते 45 वर्षापासून सुरू आहे.  या माध्यमातून आरोग्याबरोबरच राष्ट्र, समाज व मानवता उभारणीचे काम मोठ्या प्रमाणात केले जाते,असे प्रतिपादन आर्षयोग प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते जागतिक योग दिनानिमित्त मजगे नगर येथील कैलास निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. हे योग प्रशिक्षण महाराष्ट्र पतंजलिचे प्रदेश प्रमुख विष्णुजी भूतडा यांच्या अत्यंतप्रभावी मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यावेळी बाबासाहेब सुर्यवंशी, व्यंकटेश हालिंगे, अ‍ॅड.शिंदे, डॉ.सिध्देश्‍वरे, शिवाजीराव वाघमारे, मोरे ताई, माधव गायकवाड, ज्ञानेश्‍वर पाटील, ज्ञानेश्‍वर शिनगारे, सौ. पवार मॅडम,कु.पवार आदी मान्यवरांची उपास्थीती होती.
यावेळी पुढे बोलताना मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रभक्त स्वामी विवेकानंद यांच्या व भारतीय अध्यात्माच्या विचाराने प्रेरीत होऊन राष्ट्र व समाजउभारणीचे कार्य करीत आहेत. ते स्वतःहा योग अभ्यासक असल्यामुळे त्यांनी योगाचे महत्व संपुर्ण जगाला पटविले आहे त्यामुळे युनोने भारतीय विद्येला मान्यता दिली. हा भारताचा गौरव आहे. जागतीक योग दिना निमीत्‍त जगातील 176 देशात योग साधनेचे काम रामदेव बाबा, देववृत्‍त आचार्य व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे वैचारीक महत्व विषद केले आहे. हे काम गेल्या आनेक वर्षापासुन सेवा भाव वृत्‍तीने आम्ही करीत आहोत असेही ते म्हणाले. रविवारी सकाळी 8.30 ते 9.30 या वेळेत झालेल्या योग शिबीराला योग प्रेमीची उपस्थीती होती.
-



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या