पटेल चौकात अपघाताचे प्रमाण वाढले.
गतिरोधक,सिग्नल,डेंजर लाईट सिग्नल,रेडीयम दिशादर्शक फलक बसविण्याची मागणी.
औसा(विशेष रिपोर्ट-अॅड.इकबाल शेख)येथील पटेल चौकात मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक,भरधावात येणारी वाहने,त्यात चौकातील अर्धवट खराब रस्ता अशा वेगवेगळ्या कारणांमुळे पटेल चौकात अपघातांचे दुष्टचक्र सुरूच आहे.
मागील आठवडाभरात या रस्त्यावर आतापर्यंत चार मोठे अपघात घडलेली आहेत.सोलापूर महामार्गावरून येणारी भरधाव वाहने रात्रीच्या वेळी चौकात वळतीवर अंदाज न आल्यामुळे सरळ दूकानात,हाटेलात शिरत आहेत.त्यात दूकानाचे लाखोचे नुकसान होत असून या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नसून अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.लातूर-सोलापूर कडे जाणारा महामार्ग रस्ता तसेच निलंगा-उमरगाकडे जाण्यासाठी महामार्ग रस्ता हा पटेल चौक येथूनच वळण मार्ग जातो.त्याचप्रमाणे अवजड वाहनांना शहरातून जाण्यास बंदी असल्यामुळे अवजड वाहने याच महामार्गाचा वापर करतात.तसेच गेल्या कांही वर्षात या रस्त्यावर छोट्या वाहनांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे.मागील आठवडाभरात पटेल चौकात अपघाताचे प्रमाण वाढले असून भविष्यात मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तहानी होण्याची भिती नागरीकातून व्यक्त होत आहे.तरी प्रशासनाने व संबंधित रस्ते महामार्ग विभागाने त्वरीत पटेल चौकात गतिरोधक,सिग्नल,डेंजर लाईट सिग्नल,रेडीयम दिशादर्शक फलक बसवून होणारा पूढील अनर्थ टाळावा.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.