गाजीपुरा येथील एका रूग्णाचा मधुमेह व उच्चरक्तदाबाने मृत्यू

गाजीपुरा येथील एका रूग्णाचा

मधुमेह व उच्चरक्तदाबाने मृत्यू

        लातूर,दि. 24:-विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतेच्या रुग्णालयात दिनांक 23 जून 2020 रोजी 38 वर्षे वय असलेला गाजीपुरा येथील एक रुग्ण खाजगी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातुन वर्ग केल्यामुळे या रुग्णालयात अतिशय गंभीर अवस्थेत व्हेंटीलेटरवर कृत्रिम श्वासनलिकेसहीत सकाळी 8.30 वाजता दाखल झाला होता व या रुग्णाचा तात्काळ कोरोना (कोविड 19) तपासणीसाठी स्वॅब घेतला होता.

          हा रुग्ण कोरोना विलगीकरण कक्षात भरती असताना उपचारादरम्यान दिनांक 23 जून 20250 रोजी रात्री 9.00 वाजेच्या दरम्यान Diabetic Ketoacidosis व Sepsis यामुळे  मृत्यु झाला. यासंबधी पोलिस विभगास दिलेल्या (Police Inform Book) अहवालात मृत्युचे कारण हे Diabetic Ketoacidosis, Septic Shock, Known case of Diabetis Mellitus (मधुमेह)  and Hypertention (उच्च रक्तदाब) हे नमूद केले आहे.

          या रुग्णाचा कोरोना तपासणी अहवाल दिनांक 23 जून 2020 रोजी सायं 6.00 वाजता प्राप्त झाला व तो अनिर्णयीत (INCONCLUSIVE) होता. अनिर्णयीत (INCONCLUSIVE) असलेले बहुतांशी अहवाल 48 तासानंतर पुनर्तपासणी केल्यास पॉझिटीव्ह येतात. त्यामुळे कोरोना (कोविड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणुन अशा रुग्णांचा अहवाल पॉझिटीव्ह आहे असे समजुण या रुग्णाच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार करण्यासाठी मार्गदर्शक सुचनेप्रमाणे महानगरपालिकेकडे सापेविण्यात आले होते. असे अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय  विज्ञान संस्था लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या