मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांची लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवड




मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांची लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदी निवड औसा=मुख्तार मणियार
औसा : लातूर जिल्हा काँग्रेस समितीच्या जिल्हाध्यक्ष पदावर मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे व लातूर जिल्हा काँग्रेस समितीच्या शहराध्यक्षपदी अॅड.किरण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे .किरण जाधव हेअमित देशमुख यांचे विश्वासू कार्यकर्ते आहेत. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी बदल  करून तरुणांना संधी दिली आहे. लातूर जिल्हा काँग्रेस समितीच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारीआता मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व पक्षाचे विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांच्या वर देण्यात आली आहे.





 श्री.उटगे हे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे समर्थक आहेत. शहराध्यक्षपदी पालकमंत्री अमित देशमुख यांचे समर्थक ॲड. किरण जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर, दिवंगत नेते विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी मंत्री दिलीपराव देशमुख अशा या ज्येष्ठ राष्ट्रीय काॅग्रेस नेत्यांचा हा बालेकिल्ला आहे.लातूर कॉंग्रेस समितीच्या जिल्हाध्यक्ष पदावर श्रीशैल्य उटगे यांनी चांगल्याप्रकारे जबाबदारी पार पाडतील अशी आशा आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या