*शरद पवार विचार मंच निलंगा यांच्या वतीने बोगस बियाणे, सेंद्रिय खते निर्माण करणाऱ्या कंपनीवर , विक्रेते व चढ्या भावाने विक्री करणाऱ्या दुकानदारावार कारवाई करण्याची उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली मागणी*
निलंगा :- (मोईज़ सितारी)तालुक्यात अनेक कंपन्या चे प्रमाणीकरण/सत्य वर्धक लेबल असलेले दुय्यम दर्जाचे बियाणे बाजारात पुरवठा केल्यामुळे शेतकर्याने शेतात पेरणी केल्यानंतर बियाणांची उगवण न झाल्यामुळे शेतकर्यावर दुबार पेरणी चे संकट आल्यामुळे सदोष बियाणे पुरवठा केलेल्या कंपनीवर कारवाई करावी, सेंद्रिय खताच्या नावाखाली बोगस अप्रमाणित सेंद्रिय खत निर्मिती करणाऱ्या कंपनीवर, विक्री करणारे दुकानदार/विक्रेते संबंधितावर कारवाई करावी तसेच खते, बियाणे यांची कृत्रिम टंचाई करुन चढ्या भावाने विक्रेते/दुकानदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शरद पवार विचार मंच निलंगा यांनी उपविभागीय अधिकारी व तसेच कृषी मंत्री दादाजी भुसे, जिल्हाधिकारी लातुर, कृषी विभागीय आयुक्त यांच्या कडे मागणी केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष तथा शरद पवार विचार मंच चे नेते विनायक (आण्णा) बगदुरे , तालुकाध्यक्ष सुधीर दादा मसलगे, शरद पवार विचार मंच चे कार्याध्यक्ष अंगद जाधव, युवक तथा विचार मंच चे शहराध्यक्ष धम्मानंद काळे माजी तालुका अध्यक्ष संदीप मोरे , महिला आघाडीच्या महादेवी पाटील,शरद पवार विचार मंच महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी रुक्मिणी ताई कांबळे, रेश्मा पटेल, लक्ष्मण क्षिरसागर, गफ्फार भाई लालटेकडे,लिगल सेलचे अँड. गोपाळ इंगळे,अँड.हरिभजन पौळ,पांडुरंग कांबळे, महेश मसलगे,विद्यार्थी चे शैलेश जाधव, अभय चौधरी, सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस किरणकुमार सोळुंके, वैजनाथ चोपणे, सुरेश रोळे,पंढरी पाटिल,जीवन तेलंग, राजेश माने, मोहन माने,व्यंकट कुंभार ईत्यादी बरेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.