दोन धर्मियांमध्ये जाणुनबुजुन जातीय तेड निर्माण करुन धार्मिक कलह, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरला बेट यांच्यावर गुन्हा दाखल करुन तातडीने अटक करा

 दोन धर्मियांमध्ये जाणुनबुजुन जातीय तेड निर्माण करुन धार्मिक कलह, द्वेष पसरवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरला बेट यांच्यावर गुन्हा दाखल करुन तातडीने अटक करा 





औसा (प्रतिनिधी )


*रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरला बेट यांच्यावर धार्मिक द्वेष पसरवण्याचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी*


रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज सरला बेट यांच्यावर दोन धर्मांमध्ये जाणुनबुजुन जातीय तणाव निर्माण करून धार्मिक कलह आणि द्वेष पसरवण्या प्रकरणी रामगिरी महाराज विरुद्ध तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.


औसा शहरातील मुस्लिम समाजाने या प्रकरणी निषेध व्यक्त केला असून, त्यांनी हा मुद्दा गंभीर असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी प्रशासनावर दबाव आणण्याचे आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. 


या घटनेच्या अनुषंगाने, कायद्याचा अवमान झाल्याचे आणि धार्मिक सलोखा धोक्यात आले आहे. तरी रामगिरी महाराजाच्या विरूध्द योग्य ती कार्यवाही करुन गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी ही अशी मागणी कारी रफीक सिराजी व मौलाना अमजद सिद्दीकी यांच्या नेतृत्वात् मुस्लिम समाजा च्या शिष्टमंडळाने तर्फे अर्जदार म्हणून सय्यद मुजफ्फर अली इनामदार, रा. औसा यांनी तक्रार अर्ज दाखल केली आहे .या वेळी माजी शहराध्यक्ष कांग्रेस शेख शकील, माजी नगरसेवक एडवोकेट समियोद्दीन पटेल, ओ बी सी ता अध्यक्ष डॉ वहीद कुरैशी, शफीक शेख, महेमूद काज़ी आदि उपस्थित होते


घटनेचा पुढील तपास सुरू असून, पोलिसांनी या प्रकरणी लवकरच निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत. समाजातील सर्व घटकांनी शांतता आणि संयम राखावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


**शेवटची माहिती:** बातमी प्रकाशित होईपर्यंत या प्रकरणी कोणतीही अटक करण्यात आलेली नाही, मात्र तपास यंत्रणा सतर्क असून, कायद्याची प्रक्रिया वेगाने पुढे नेण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या