इस्लाम धर्माचे प्रेषीत यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करुन मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवणाऱ्या रामगिरी महाराजावर कडक कार्यवाही करण्याची समस्त औसा तालुका मुस्लिम समाजाची मागणी
औसा तहसील कार्यालयासमोर सुमारे अर्धा तास धरणे देत अटक करण्याची मागणी चे निवेदन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना औसा तहसीलदारांमार्फत निवेदन सादर
एस ए काझी
औसा : - इस्लाम धर्माचे प्रेषीत यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करुन समस्त मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवणाऱ्या रामगिरी महाराजावर कडक कार्यवाही करून अटक करण्याची समस्त औसा तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली असून दि. २० ऑगस्ट २०२४ मंगळवार रोजी सकाळी ११ : ०० वाजता औसा येथील तहसील कार्यालयासमोर सुमारे अर्धा तास धरणे देत, हाताच्या दंडावर काळ्या पट्ट्या बांधून, हातात निषेध व्यक्त करणारे फलक घेत आंदोलन करण्यात आला व महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना औसा तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले.
रामगिरी महाराज सरला बेट यांनी मौजे पांचाळे ता. सिन्नर जि. नासिक या ठिकाणी एका सप्ताहाच्या दरम्यान प्रवचनामध्ये उपस्थित जन सामांन्यासमोर मुस्लीम धर्माच्या प्रेषितांची प्रतिमा मलीन होईल असे खोटे वक्तव्य करून जाणिव पुर्वक समाजा - समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले आहे. जेणे करुन परिसरात व महाराष्ट्रामध्ये तसेच देशात व विदेशातही याचे पडसाद उमटत आहेत व यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तसेच ज्यामुळे देशाची प्रतिमा अंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन होऊन त्याचा देशाच्या गुंतवणुकीवर सुध्दा मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी अशा भामट्या व भोंदु रामगिरी महाराजाकडून मुस्लीम धर्माविरोधात जाणुन बुजुन धार्मिक भावना दुखवून जातीय दंगल घडविण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य केल आहे. असे समजते. मुस्लीम समाजाचा या प्रवचनामध्ये अर्थाअर्थी संबंध नसताना एखाद्या धर्माला खाली दाखवण्यासाठी व आपला धर्म श्रेष्ठ आहे असे दाखवण्याचा प्रयत्न भोंदु महाराजांनी केलेला आहे. सदरील महाराजावर राज्यात व देशात अनेक पोलीस स्टेशनमध्ये केसेस होत आहेत तरीसुध्दा गृह विभाग पोलीस खात्याकडून आतापर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे शांतीप्रीय मुस्लिम समाजामध्ये असंतोष निर्माण होत आहे. यापुढे राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शंका नाकारता येत नाही. यास सर्वस्व जबाबदार असणाऱ्या महाराज विरोधात राज्यात आतापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही व अटक करण्यात आली नाही ही गंभीर बाब असून शासनाने त्वरीत आपल्या स्तरावरुन महाराष्ट्र शासनाला व त्याच्या अखत्यारीतील खासकरुन गृह मंत्रालयास सदरील भोंदु महाराजावर कडक कार्यवाही करुन अटक करण्याचे आदेश द्यावेत अशी विनंतीची मागणी समस्त औसा तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी केली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.