पावसाच्या पाण्याचा बंदोबस्त करा तसेच रस्ता व नाल्याचे बांधकाम तात्काळ सुरु करा मुख्याधिकारी नगर परिषद कडे मागणी
ओपन स्पेसच्या दोन ठिकाणी भिंत बांधून पावसाचे पाणी अडविल्या मुळे आरोग्य धोकयात
ऐका हो ऐका 20 वर्षा पासून वनवास इथला संपत नाही
औसा :सविस्तर वृत असे की की, हाश्मीनगर, लेक्चर कॉलनीच्या पूर्व भागात रहात असलेल्या भागात लेक्चर कॉलनीच्या लोकांनी ओपन स्पेसच्या दोन ठिकाणी भिंत बांधून पावसाचे पाणी अडविले आहे. वस्तूतः नैसर्गिक उतार व प्रवाहानूसार पावसाचे पाणी जाणे आवश्यक आहे. परंतू भिंत बांधून आणि त्याला मुरूम टाकून पुष्टी देवून पावसाचे पाणी अडविण्याचे काम केले आहे.
पावसाचे पाणी अडविल्यामुळे पाणी साचून आमच्या घरामध्ये येत आहे. सततच्या पावसामुळे पाणी मुरून आमची घरे कमकुवत होत आहेत. रस्ते व नाली बांधकाम नसल्यामुळे नागरिकांना येण्याजाण्यास खूप त्रास सहन करावे लागत आहे व ठिकठिकाणी विशेषतः (ज्यांचे प्लॉटचे बांधकाम झालेले नाही) अशा ठिकाणी डबके तयार झाली आहेत या डबक्यामुळे डांस व डेंग्यूचे मच्छर आणि साप विंचू असे विषारी जीव यांचा रहिवास वाढला आहे या मुळे वृध्द व लहान बालके आजारी पडत आहेत.
सतत २५ वर्षापसून आम्ही येथे रहात असून 'हाश्मीनगर हद्दीत नाही' हे कारण पूढे करून रस्ते व नाल्याचे बांधकाम झालेले नाही.
विशेष म्हणजे आमच्या हाश्मीनगर मध्ये सर्व सुशिक्षित डॉक्टर, इंजिनिअर, प्राचार्य आणि कार्यरत व सेवानिवृत् शिक्षक वृध्द रहात आहेत. असे असताना या भौतिक गरजापासून आम्ही वंचित आहोत.
ऑगस्ट् २०१४ मध्ये याबाबत निवेदन दिले होते. तयार झालेल्या डबक्यांचे फोटोही व्हॉटसअपवर प्रसारित केले होते. परंतू अद्याप पर्यंत आमच्या अडचणीची पूर्तता डबक्यांचे ही ि आमच्या निवदेनाची दखल घेतली नाही. तसेच २०१४ पासून करत असलेल्या निवेदनाला केराची टोपली दाखवून आमची कुर थट्टा केली जात आहे.
तरी मा. मुख्याधिकारी साहेबांनी आमच्या निवेदनाची तिव्रता व गांभीर्य लक्षात घेवून मानवतेच्या दृष्टीने विनाविलंब निर्णय घेवून कार्यवाही करावी. सदर निवेदनाची पुर्तता न झाल्यास होणाऱ्या वित्त व जिवित हानीस न. प. औसा जबाबदार राहिल.
तसेच सदर निवेदनाची पूर्तता होण्यास विलंब झाल्यास आम्ही औसा मोडवर रस्ता रोको आंदोलन व आमरण उपोषण करु.असे
समस्त नागरीक हाश्मी नगर औसा येथील रहिवासी शेख आर.जी
शेख एन ए,अकबर मणियार,अफजल मणियार,चौधरी जी एस
सिद्दीकी चांदपाशा, जब्बार खाँ मुलाणी,देशमुख मुश्ताक,शेख टी.एम. पटेल हन्नान,सयद एस एस सम्यद जमीर,सम्यद खुदुस, सय्यद मुजीब,शख खलील, शेख अफसर,मौ जावेद,शेख संदी सर,अम्मार हाश्मी, गायकवाड एम एस,देवनाडे एस एम आदि ने निवेदन देऊन नमूद केले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.