*पोलीस भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले नियुक्तीचे आदेश*
लातूर प्रतिनिधी
याबाबत माहिती अशी की लातूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर एकूण 64 पोलीस अमलदारांची भरती करिता दिनांक 19/06/2024 पासून पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात अतिशय पारदर्शकपणे भरती प्रक्रिया राबविण्यात आली. सदर भरती प्रक्रियेत विविध परीक्षा व चाचण्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवाराची मेरिट प्रमाणे लिस्ट लावून पोलीस भरती संदर्भातले मापदंड पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी व इतर कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्याने दिनांक 23/08/2024 रोजी एकूण 30 उमेदवारांना पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी पोलीस अंमलदार पदाचे नियुक्ती आदेश दिले.
पोलीस भरती सहभाग घेऊन उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना काही दिवसातच लातूर जिल्हा पोलीस दलात पोलीस अमलदर म्हणून नियुक्तीचे आदेश मिळाल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण होते. तसेच लवकरात लवकर नियुक्ती आदेश मिळाल्याने समाधान व्यक्त करून पोलीस दलाचे व महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त केले आहेत.
निवड झालेल्या एकूण 64 उमेदवार पैकी 30 उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी व इतर कागदपत्राची पडताळणी पूर्ण झाल्याने त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आले असून उर्वरित 34 उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी व कागदपत्रांची तपासणी होताच त्यांना पण लवकरात-लवकर नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.