शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी अट रद्द करून सरसकट मदत करावी. औसा शहर काँग्रेस कडून तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.

 शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी अट रद्द करून सरसकट मदत करावी.


औसा शहर काँग्रेस कडून तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.






शेख बी जी.


औसा.दि.14 तहसीलदार यांना औसा तालुका काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांसाठी असलेली ई पिक पाहणी आठ रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट मदत जाहीर करावी व शेतकऱ्यांचा त्रास दूर करावा अशा आशयाचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने माननीय मुख्यमंत्री साहेबांना तहसीलदार मार्फत देण्यात आले.



 निवेदनात सन २०२३ च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपैकी ई-पिक पाहणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य घोषित करण्यात आला आहे. परंतु त्यात जे शेतकरी ई-पिक पाहणी करु शकले नाहीत अशांना सदरील अर्थसहाय्यापासुन वंचित राहत आहेत. ई-पिक पाहणी न करणाऱ्या शेतकऱ्यांचेही नुकसान झालेले आहे. म्हणून त्यांना सदरील अर्थसहाय्यापासुन वंचित ठेवता येत नाही. म्हणून सदरील अर्थसहाय्य प्राप्त करण्यासाठी ई-पिक पाहणीच अट रद्द करुन सर्व शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य मंजुर करण्याची करण्याची विनंती निवेदनात केली आहे.

निवेदनावर तालुकाध्यक्ष दत्तोपंत सूर्यवंशी कार्याध्यक्ष शहानवाज पटेल शहराध्यक्ष अजहर हाश्मी, सई ताई गोरे, एडवोकेट मंजुषाताई हजारे, खुनमीर मुल्ला, पुरुषोत्तम नलगे, मुजम्मिल शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या