पेट्रोल-डिझेल दरवाढीचं सत्र सुरूच, सलग तेराव्या दिवशी झाली दरवाढ.
१३ दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात ७ रूपयांपेक्षा अधिक वाढ.
जूनपूर्वीच्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली नव्हती. या काळातील लॉकडाउनच्या कालावधीत इंधनाचा वापरही मोठय़ा प्रमाणात कमी झाला होता. दरवाढ नसल्याने मे महिन्याच्या अखेरीस शहरामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर सुमारे ७६ रुपये, तर डिझेलचा प्रतिलिटर दर ६५ रुपयांच्या जवळपास होता. परंतु आता गेल्या १३ दिवसांपासून पेट्रोल दरवाढीचं सत्र मात्र कायम आहे. दरम्यान, आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात ५६ पैशांची तर डिझेलच्या दरात ६३ पैशांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७८.३७ रूपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ७७.०६ रूपये प्रति लिटर इतके झाले आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.