हिंगोलीत चार नवीन रुग्ण तर एकास डिस्चार्ज
· जिल्ह्यात 36 कोरोना बाधीत रुग्ण
हिंगोली, दि.18: इमामोद्दीन इशाती
जिल्ह्यात आज 4 नवीन रुग्ण आढळून आले असून 1 रुग्ण बरा झाल्याने त्यास डिस्चार्ज देण्यात आला. यात लिंबाळा येथील कोरोना केअर सेंटरमध्ये भरती असलेले 2 व्यक्ती तर वसमत येथील कोरोना केअर सेंटरमध्ये भरती असलेले 1 व्यक्ती आणि राज्य राखीव पोलीस बल येथील 1 जवानास कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. बाधीत झालेले चार हि व्यक्ती मुंबई येथून आलेले आहेत.
आजपर्यंत हिंगोली जिल्ह्यात एकुण 237 व्यक्तींना कोविड-19 ची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यापैकी 201 रूग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात 36 कोरोना बाधीत रुग्ण भरती असून या सर्व रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार करण्यात येत आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कुठल्याही प्रकारची गंभीर लक्षणे सद्यस्थितीत नाहीत.
नागरिकांनी अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक काम वगळता घरीच थांबुन प्रशासनास सहकार्य करावे. सर्वांनी मास्कचा वापर करत आपले व इतरांचे संरक्षण करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर ‘आरोग्य सेतु’ ॲप डाऊनलोड करुन घ्यावे. जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधीत रुग्ण असल्यास आपणांस हे ॲप सतर्क करण्यास मदत करेल, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.