खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त
मुरूड येथे वृक्षारोपन व आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक औषधाचे वाटप
लातूर प्रतिनिधी :
काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालय मुरुड येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. ग्रामीण रुग्णालयाचा अधिक गतीने विकास व्हावा व जास्तीत जास्त नागरिकांना या रुग्णालयातून दर्जेदार उपचार मिळवा या करिता आमदार धीरज विलासराव देशमुख प्रयत्न करत आहेत.
खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय मुरुड च्या परिसरात झाडे लावण्यात आली. तसेच कोरोना आजाराच्या पार्श्वभूमी वर ग्रामीण भागातील नागरिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढावी याकरिता आर्सेनिक अल्बम होमिओपॅथिक औषधाचे वाटप करण्यात आले.
यावेळी लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नवगिरे यांनी आर्सेनिक अल्बम या औषधाच्या सेवन विषयी सर्व आवश्यक ती माहिती नागरिकांना सांगून कोरोणा आजाराच्या साथीच्या काळामध्ये दक्षता घ्यावयाच्या गोष्टींची सविस्तर माहिती दिली.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. लक्ष्मण देशमुख, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. दिनेश नवगिरे, डॉ. सुरज माळी, राजेंद्र मस्के, चंद्रकांत मोरे, जगन चव्हाण, रवी अंधारे, संतोष देवकर, संजय अंधारे, मुरुड युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष उत्तम जाधव, महेश भोसले, समाधान गायकवाड, सोहित शेख, शामराव ईटकर, महेश ओझा, दिलीप इटकर, पांडुरंग माने इत्यादी यावेळी हजर होते
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.