लक्ष्मण बारसल्ले यांना कोरोना योध्दा पुरस्कार
प्रतिनिधी_ मुख्तार मणियार औसा
औसा=जगाच्या पाठीवर कोरोना या महामारीने धुमाकूळ घातला असून त्याचे पडसाद महाराष्ट्रासह संपूर्ण जगात उमटले असून दिवसेंदिवस अशा कठीण प्रसंगी औसा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत लक्ष्मण संग्राम बारसल्ले हे पोलीस काॅन्स्टेबल कोरोना म्हामारीच्या लढाईत उल्लेखनीय काम करीत आहेत.नागरिकांची सुरक्षा व कायद्याचे पालन करीत सर्व सामान्य जनतेला सेवाभावीच्या वतीने व अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत असल्याबद्दल पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण संग्राम बारसल्ले औसा यांना अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्था यांच्या वतीने कोरोना योध्दा सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले आहे.त्यांच्या या कौतुकास्पद कार्याबद्दल औसा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले,पोलिस निरीक्षक नरसिंह ठाकूर व सर्व कर्मचारी व समाज बांधवांनी आनंद व्यक्त केला आहे. संपूर्ण जगात घबराट पसरली असताना, आरोग्य व पोलीस खात्यातील अधिकारी व कर्मचारी आपल्या व कुटुंबीयांच्या जीवाची पर्वा न करता कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी अहोरात्र लढताहेत.औसा पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण संग्राम बारसल्ले यांना कोरोना योध्दा पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल लातूर जिल्ह्यातील कुंभार समाज व वाढवणा (बु.) ग्रामस्थांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.