गृह विभागाच्या उच्च श्रेणी व कनिष्ठ श्रेणी परीक्षा पुस्तकांसह घ्या - आ. अभिमन्यू पवार यांची राज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे मागणी






गृह विभागाच्या उच्च श्रेणी व कनिष्ठ श्रेणी परीक्षा पुस्तकांसह घ्या - 



आ. अभिमन्यू पवार यांची राज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्याकडे मागणी. 



औसा -इलयास चौधरी
 पोलीस परीक्षेसाठी सध्याची कोवीड १९ मुळे निर्माण झालेली परिस्थिती तसेच या परीक्षेसाठी बदलण्यात आलेला व नव्याने समाविष्ट केलेला अभ्यासक्रम सद्या परीक्षार्थी अधिकारी यांच्याकडे उपलब्ध नसणारे अभ्यास साहित्य व परिक्षेच्या तयारीसाठी एक महिन्यापेक्षा कमी असलेला कालावधी या सर्व बाबींचा विचार करून भापोसे विभागीय परिक्षेच्या धर्तीवर उच्च श्रेणी व कनिष्ठ श्रेणी परीक्षा या पुस्तकासह घेण्यात यावी अशी मागणी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे. 

  

          २०१३ नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य पोलीस सेवेतील सरळसेवेने भरती झालेल्या पोलीस उपाधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या उच्च श्रेणी व कनिष्ठ श्रेणी परीक्षा घेतलेल्या नाहीत. २२ मे २०२० रोजी उपरोक्त परीक्षा घेण्याचा शासन आदेश गृह विभागाने जारी केला आहे. या परीक्षेसाठी अभ्यासक्रमही बदलण्यात आला आहे. नव्या अभ्यासक्रमात नवीन कायदे सामाविष्ट करून कायदेविषयक बाबींचा अभ्यासक्रम वाढविण्यात आला आहे. नवा अभ्यासक्रम जुन्या अभ्यासक्रमापेक्षा विस्तृत आहे ज्याच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळणं आवश्यक आहे. १५ ते १७ जुलै २०२० दरम्यान या परीक्षा आयोजित करण्याचे आदेशही निघाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


          घोषणा झाल्यापासून अवघ्या २ महिन्यात परीक्षा, अभ्यासक्रमात करण्यात आलेले बदल आणि कोरोनामुळे पोलीस बांधवांवर मागच्या ३ महिन्यांपासून कामाचा असलेला प्रचंड ताण आदी बाबींचा सकारात्मक विचार करून या परीक्षा पुस्तकांसह घेण्यात याव्यात अशी विनंती आज निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना केली आहे!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या