ग्रीन लातूर वृक्ष टिमतर्फे आटोळा तालुका चाकुर जिल्हा लातूर येथे १०० झाडांचे रोपण






ग्रीन लातूर वृक्ष टिमतर्फे आटोळा तालुका चाकुर जिल्हा लातूर येथे १०० झाडांचे रोपण.
ग्रीन लातूर वृक्ष टिमतर्फे आटोळा तालुका चाकुर जिल्हा लातूर येथे १०० झाडांचे रोपण करण्यात आले. पिंपळ, आंबा, आवळा, बकुळ, कडुनिंब, कदंब अशा पर्यावरणपुरक मोठी १०० झाडे लावण्यात आली. याकरीता लातूर शहरात कार्यरत असलेल्या ग्रीन लातूर वृक्ष टिम ने सहकार्य केले. यावेळी ग्रीन लातूर वृक्ष टिमचे कल्पना फरकांडे, मनपा लातूर नगरसेवक इम्रान सय्यद, प्रमोद निपानीकर, पुजा निचळे, हितेश डागा, मनमोहन डागा, महेश गेलडा हे उपस्थित होते. आटोळ गावातील  सरपंच - रेणुका तोडकरी, पंचायत समिती सदस्य - महेश भाऊ वत्ते,  गणेश फुलारी पोलिस पाटील,  परमेश्वर सावंत,  पाडुंरग शिंदे,  खयुम दरोगे,  नवाज मुजावर,  हावगी तोडकरी,  संतोष कलवले,  विठ्ठल फरकांडे,  राम फरकांडे,  ज्ञानोबा फरकाडे,  विशाल फरकांडे, प्रतिक गव्हाणे यांनी वृक्ष लागवड करीता पुढाकार घेतला व वृक्ष सगोपनाची जवाबदारी घेतली. प्रत्येक गावात वृक्ष संपदा वाढायला हवी आणि परदेशी झाडे न लावता पर्यावरणपुरक झाडे लावण्यात यावी असे मत लातूर शहर मनपा नगरसेवक व ग्रीन लातूर वृक्ष टिमचे समन्वयक इम्रान सय्यद यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या